Zomato ची नवीन जाहिरात पाहिली का? एक नंबर क्रिएटिव्हिटी, ‘दूध मांगोगे दूध देंगे, खीर मांगोगे खीर देंगे’
सोशल मीडियावर एक जाहिरात व्हायरल झाली, ज्यामुळे लोकांना धक्का बसला.
जाहिरातींचं जग इतकं क्रिएटिव्ह आणि अद्भूत असतं की कधी कधी कंपन्या त्यांच्या क्रिएटिव्हिटीमुळे लोकांना आश्चर्याचा धक्का देतात. नुकतंच सोशल मीडियावर एक जाहिरात व्हायरल झाली, ज्यामुळे लोकांना धक्का बसला. या जाहिरातीची खास गोष्ट अशी की, याच रस्त्यावर दोन मोठ्या होर्डिंग्ज लागल्या. या होर्डिंग्ज व्हायरल झाल्यात कारण त्यावर ज्या ओळी लिहिल्या गेल्यात त्या फार मजेदार आहेत.
ही जाहिरात खरंतर झोमॅटो आणि ब्लिंकिटची आहे. झोमॅटोच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करण्यात आले असून हे इन्स्टा सहयोग असल्याचे कॅप्शन लिहिले होते. होर्डिंग्जवर ब्लिंकिटने लिहिले आहे की, दूध मागितले तर दूध मिळेल. काही अंतरावर झोमॅटोच्या होर्डिंग्जवर खीर मागितली तर खीर देऊ असं लिहिलंय.
View this post on Instagram
गंमत म्हणजे दोन्ही बोर्ड एकाच चित्रात दिसत आहेत. अशात ही ओळ पोस्ट करताच ती प्रचंड व्हायरल झाली. लोकही प्रतिक्रिया देऊ लागले. एका युझरने एन्जॉय करताना लिहिले की, तुम्ही लोक स्विगीला कसे विसरलात?
झोमॅटो ही ब्लिंकिटची मूळ कंपनी आहे, हे अनेकांना माहीत नसेल. याला आधी ग्रोफर्स असे नाव देण्यात आले, नंतर झोमॅटोने ते विकत घेतले तेव्हा त्याचे नाव ब्लिंकिट असे पडले. सध्या ही जाहिरात प्रचंड व्हायरल होत आहे. या ओळी माँ तुझे सलाम नावाच्या चित्रपटातील संवादाने प्रेरित आहेत. लोक ते प्रचंड शेअर करत आहेत.