सासूबाई जोरात! लेकीला सोडून जावयालाच मिठी मारून हमसून हमसून रडली, त्यानंतर लगेच… असं काय घडलं लग्नात?
Viral Video: सोशल मीडियावर एका वधूला निरोप देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

लग्नानंतर मुलीला निरोप देण्याचा क्षण प्रत्येक आई-वडिलांच्या आयुष्यातील कठीण क्षण असतो. ज्या मुलीला त्यांनी लहानाचे मोठे केले, तिचे प्रेमाने पालनपोषण केले त्या काळजाच्या तुकड्याला लग्नानंतर दुसऱ्याच्या घरी पाठवणे वेदनादायी असते. निरोपाच्या या क्षणी डोळ्यातून अश्रू येणे हे स्वाभाविक आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हाच क्षण दाखवण्यात आला आहे. पण त्यात थोडा ट्विस्ट आहे जो पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल.
नवरदेवाने जिंकले मन
Gavran_Tadka नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओची खास गोष्ट म्हणजे निरोप देताना आई आपल्या मुलीऐवजी आपल्या जावयाला मिठी मारून रडत असते. त्यामुळे नवरदेवालाही अश्रू अनावर होतात. एका बाजूला सासूबाईंचा हात पकडून तर दुसऱ्या बाजूला पत्नीला जवळ करुन नवरदेव दोघींचे सांत्वन करताना दिसतो. त्यानंतर नवरी एक-एक करुन सर्वांना भेटते. पण तिने धाकट्या भावाला मिठी मारताच, भावाने तिच्या कानात कितीही कुजबुज केली. ती ऐकून नवरी डोळे पुसते आणि हसू लागते. नवरीचा निराश चेहरा आनंदाने खुलतो.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकजण या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत. व्हिडीओला १३०० हून अधिक लाइक्स आले आहेत. तसेच यूजर्सने भावूक कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिली आहे की, हा व्हिडीओपाहून माझ्या डोळ्यातही पाणी आले. नवरदेव कसा बायको आणि सासूबाईंचे सांत्वन करत आहे. दुसऱ्या एका यूजरने, हा क्षण खरच भावूक करणारा आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘आपले सर्व काही सोडून दुसऱ्याच्या घरी राहायला जाणे तितके सोपे नाही’ अशी कमेंट केली आहे.
