Video : ‘मैं झुकेगा नहीं’चं आतापर्यंतचं Cute version; लोक म्हणतायत, आईनं पुष्पाला जरा जास्तच पाहिलेलं दिसतंय!

Pushpa fever : सोशल मीडियावर (Social media) काय ट्रेंड (Trend) होत असेल, तर तो म्हणजे अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर पुष्पा या चित्रपटातील जबरदस्त डायलॉग्स. आता तर सोशल मीडियावर एका नवजात बालकाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे.

Video : 'मैं झुकेगा नहीं'चं आतापर्यंतचं Cute version; लोक म्हणतायत, आईनं पुष्पाला जरा जास्तच पाहिलेलं दिसतंय!
नवजात बालकालाही चढला पुष्पाचा फिव्हरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 3:48 PM

Pushpa fever : गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर (Social media) काय ट्रेंड (Trend) होत असेल, तर तो म्हणजे अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर पुष्पा या चित्रपटातील जबरदस्त डायलॉग्स आणि त्याच्या जबरदस्त गाण्यांच्या हुक स्टेप्स. सामान्य माणूस असो, वा सेलिब्रिटी… प्रत्येकजण या चित्रपटाच्या डायलॉग्स आणि गाण्यांच्या हुक स्टेप्सवर रील बनवत आहे आणि ते इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. आता तर सोशल मीडियावर एका नवजात बालकाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हाला ‘पुष्पा’चा ‘मैं झुकेगा नहीं’ हा प्रसिद्ध डायलॉग आठवेल. जन्मानंतर अल्लू अर्जुनच्या सिग्नेचर स्टाइलशी अगदी जुळणारे असे काहीतरी करताना हे मूल कॅमेऱ्यात कैद झाले आहे. नवजात मुलाचा हा स्वॅग पाहून आता सोशल मीडियावरील लोकही त्या बाळाचे चाहते झाले आहेत. सर्वजण या गोंडस बाळाच्या प्रेमातच पडले आहेत.

‘मैं झुकेगा नहीं’ची आठवण

व्हायरल झालेल्या काही सेकंदांच्या या क्लिपमध्ये नवजात अर्भक अंथरुणामध्ये आहे. तो त्याच्या हालचाली करत आहे. पण ते करत असताना कॅमेऱ्यात असे काही कैद होते, की पुढच्याच क्षणी तुम्हाला पुष्पा चित्रपटाची आठवण होईल. व्हिडिओमध्ये तुम्ही नवजात बालक अल्लू अर्जुनची सिग्नेचर स्टेप करताना पाहू शकता. क्लिपच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला पुष्पाचा लोकप्रिय डायलॉग ‘मैं झुकेगा नहीं’ ऐकू येतो.

View this post on Instagram

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

इन्स्टाग्रामवर शेअर

नवजात बालकाचा हा गोंडस व्हिडिओ इन्स्टाग्रामवर giedde नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच जास्त पसंत केला जात आहे. लोक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तो शेअर करत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावर आपल्या कमेंट्सही देत आहेत.

‘नायकाचा जन्म झाला आहे’

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरने कमेंट करत लिहिले, की आईने पुष्पाला जरा जास्तत पाहिलेले दिसते. दुसरा यूझर म्हणतो, की ‘मैं झुकेगा नहीं’ डायलॉग का ये अब तक का सबसे क्यूट वर्जन है. आणखी एका यूझरचे म्हणणे आहे, की पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या सीरिजची तयारी करावी, कारण नायकाचा जन्म झाला आहे. याशिवाय, बहुतेक यूझर्स अल्लू अर्जुनला टॅग करून ते पाहण्यासाठी इन्व्हाइट करत आहेत. एकूणच हा व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे.

आणखी वाचा :

Viral : ‘रासोडे में कौन था’नंतर आता ‘खाली छोरी पटाता है’नं घातलाय धुमाकूळ, 82 लाखांहून जास्त व्ह्यूज; पाहा ‘हा’ Video

Viral video : मेंढीला गुदगुल्या का करतोय ‘हा’ कुत्रा? कारण वाचून तुम्हालाही हसायला येईल

PV Sindhu : Badminton खेळाडूच नाही तर उत्तम Dancerही! सोशल मीडियावरचा Trend केला Follow, पाहा Video

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.