AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | घरासमोर येताच आकाश उजळलं, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी, नव्या नवरीची ‘रॉयल एन्ट्री’ पाहाच

आपल्या सासरच्या घरी आल्यानंतर या नवरीचं जंगी स्वगत करण्यात आलंय. या स्वागताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (newly wed couple welcome video)

Video | घरासमोर येताच आकाश उजळलं, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी, नव्या नवरीची 'रॉयल एन्ट्री' पाहाच
bride welcome viral video
| Updated on: May 08, 2021 | 9:28 PM
Share

मुंबई : आपल्याला आयुष्यात एक चांगला जोडीदार मिळावा असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. चांगल्या जोडीदारासाठी प्रत्येक मुलीने एकदातरी देवाकडे प्रार्थना केलेली असते. मात्र, जोडीदारासोबतच सासरची मंडळीसुद्धा मनमिळावू आणि तळहाताच्या फोडासारखे जपणारे भेटले तर ? असंच काहीसं या व्हिडीओमधील नव्या नवरीसोबत घडलंय. आपल्या सासरच्या घरी आल्यानंतर या नवरीचं जंगी स्वगत करण्यात आलंय. या स्वागताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (newly wed couple is heartily welcomed by relatives bride welcome video goes viral)

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे ते समजू शकलेले नाही. मात्र, त्याची सध्या चांगलीच चर्चा होतेय. खास म्हणजे मुलींकडून या व्हिडीओला पसंद केले जात आहे. व्हिडीओ शेअर करताना अनेक मुलींनी असे स्वागत माझेसुद्धा व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. व्हिडीओमध्ये नव्याने लग्न झालेली एक जोडी एका आलीशान घरासमोर उभी असल्याचे दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये वर आणि वधूच्या मागे त्यांचे नातेवाईक उभे असल्याचं दिसतंय. वधू आणि वराच्या समोर आतषबाजीमुळे संपूर्ण आकाश उजळून निघाले आहे. तसेच समोर असलेल्या घरासमोर रंगीबेरंगी फटाके फुटताना दिसतायत. रंगीबेरंगी आतषबाजी पाहून नव्या जोडीसमोर लहान मुलं आनंदात नाचत आहेत. विशेष म्हणजे या वेळी नव्याने नवरी झालेल्या मुलीच्या अंगावर फटाके उडू नयेत म्हणून बाजूला अभी असलेली एक व्यक्तीने नवरीच्या डोक्यावर हात धरला आहे.

मुली भावुक, म्हणतायत माझंसुद्धा असंच स्वप्न 

हा सर्व प्रकार पाहून सोशल मीडियावर अनेकजण भारावून गेले आहेत. लग्न झालेल्या प्रत्येक जोडीचे असे स्वप्न असते असे अनेकांनी लिहले आहे. तर अनेक मुलींनी मलासुद्धा असंच घर मिळावं, हे माझंसुद्धा स्वप्न असल्याचे सांगितले आहे. हा व्हिडीओ पाहून एका तरुणाने तर मीसुद्धा माझ्या बायकोचे अशाच पद्धतीने स्वागत करेन असं म्हटलंय.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, हा व्हिडीओ ‘@gostudyiqraa’ नावाच्या ट्विटर अकाऊंटर शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, या व्हिडीओची सगळीकडे चर्चा होत असून त्याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे.

इतर बातम्या :

आपल्या फांदीवर बसणाऱ्या प्रत्येक पक्ष्याचा जीव घेतं हे झाड, म्हणून त्याला ‘बर्ड किलर’ म्हणतात

Video | जिवंत माशांनी भरलेला ट्रक उलटला, लोकांची मासे पकडण्यासाठी झुंबड

Video | महागडी दारु, खमंग चकणा, महिलांच्या ‘ओल्या पार्टीची’ थेट आयपीएस अधिकाऱ्याकडून दखल, व्हिडीओ व्हायरल

(newly wed couple is heartily welcomed by relatives bride welcome video goes viral)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.