AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगभरातील इंटरनेट उद्या ठप्प होणार? दाव्यामागील सत्य काय?

16th January Internet Shutdown: 16 जानेवारीला जगभरात इंटरनेट बंद करण्यात येणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर काही व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. इन्स्टाग्रामपासून व्हॉट्सअ‍ॅपपर्यंत लोक हा दावा व्हायरल करत आहेत. हा दावा खरा आहे की सोशल मीडियावर पसरणारी एक अफवा आहे, हे जाणून घेऊया.

जगभरातील इंटरनेट उद्या ठप्प होणार? दाव्यामागील सत्य काय?
Internet
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 7:19 PM

Internet Shutdown Tomorrow : 16 जानेवारीला जगभरात इंटरनेट बंद करण्यात येणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक शार्क समुद्राच्या खालून जाणाऱ्या इंटरनेट केबल कापताना दिसत आहे. तर याचा संबंध अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याशीही जोडला जात आहे. पण, सत्य काय आहे, जाणून घेऊया.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंवरून असे दिसून येते की सिम्पसन कार्टूनने 16 जानेवारी 2025 रोजी जागतिक इंटरनेट शटडाऊनची भविष्यवाणी केली होती. या व्यंगचित्रातील कोणतेही भाकितही खोटे नसल्याचेही बोलले जात आहे. या व्हिडिओमध्ये एक शार्क समुद्राच्या खालून जाणाऱ्या इंटरनेट केबल कापताना दिसत आहे. त्यामुळे जगभरात इंटरनेट ठप्प झाले आहे. व्हिडिओमध्ये या घटनेचा संबंध अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याशीही जोडला जात आहे.

तज्ज्ञ आणि फॅक्ट चेकिंग

तज्ज्ञ आणि फॅक्ट चेकिंग इन्स्टिट्यूटचे म्हणणे आहे की, हा व्हिडिओ पूर्णपणे एडिट करण्यात आला आहे. ‘द सिम्पसन’ने अशी भविष्यवाणी कधीच केली नव्हती. ‘द सिम्पसन’ आपल्या व्यंग्य आणि काल्पनिक भाकीतांसाठी ओळखला जातो, परंतु व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेली दृश्ये मालिकेच्या कोणत्याही अधिकृत भागाशी जुळत नाहीत.

‘हा’ व्हिडीओ का व्हायरल झाला?

सोशल मीडियावर फेक किंवा सनसनाटी मजकूर वेगाने पसरतो. हा व्हिडिओ ‘द सिम्पसन’ची विश्वासार्हता आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय प्रभावाशीही जोडला गेला आहे, ज्यामुळे तो अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर इंटरनेट शटडाऊनसारख्या काल्पनिक परिस्थितीमुळेही लोकांची उत्सुकता वाढली आहे.

सिम्पसनचा भविष्यवाण्यांशी संबंध काय?

‘द सिम्पसन’ या शोमध्ये स्मार्ट वॉच किंवा ट्रम्प यांचे अध्यक्षपद अशा अनेक घटना दाखवण्यात आल्या आहेत, ज्या नंतर प्रत्यक्षात आल्या. पण या प्रकरणात मालिकेचा भविष्यवाणीचा दावा पूर्णपणे खोटा आहे.

16 जानेवारी 2025 रोजी जागतिक इंटरनेट शटडाऊनचा दावा केवळ व्हिडिओवर आधारित आहे. त्यात काहीही तथ्य नाही. ‘द सिम्प्सन्स’ या मालिकेच्या नावाने ही काल्पनिक आणि बनावट गोष्टी आहे. त्यामुळे अशा व्हायरल कंटेंटवर फॅक्ट चेक न करता त्यावर विश्वास ठेवून अजिबात घाबरू नका.

भविष्यात असा कोणताही खळबळजनक व्हिडिओ आढळल्यास त्याची सत्यता तपासल्याशिवाय शेअर करणे टाळा. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांपासून सावध राहा आणि विश्वसनीय स्त्रोतांकडूनच माहिती मिळवा.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.