कारवर लावले एक लाख फटाके, धमाका झाल्यानंतर काय झाले पहा
अमित शर्माने त्याच्या कारवर संपूर्ण भागाला फटाक्यांच्या माळा चिपकवल्या होत्या. गाडीवर फटाके ठेवल्यानंतर त्या वाजून नेमकं काय घडते याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी अमित शर्माने हा व्हिडिओ बनवला होता.

युट्युबवर अनेक हटके व्हिडिओ बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक तरुण-तरुणी अर्थार्जनाचा प्रमुख स्रोत म्हणून अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत आहेत. यासाठी वाटेल ते किंमतही मोजली जात आहे. काही युट्युबर साहसी थरारक प्रात्यक्षिके करून आपले व्हिव्हर्स वाढवत आहेत. यामध्ये आघाडीवर असलेल्या अमित शर्मा या तरुणाने दिवाळीच्या मुहूर्तावर केलेला व्हिडिओ भलताच व्हायरल (Video Viral) झाला आहे. मात्र यासाठी त्याने केलेला कारवर फटाक्यांचा प्रयोग (Experimenting with fireworks on cars) त्याला चांगलाच महागात पडला आहे. लवंगी फटाक्या लावला, मात्र त्यामुळे कारची प्रचंड होरपळ (Car Burned) झाल्याने अमित शर्माला लाखाच्या घरात फटका बसला आहे.
कारला चारही बाजूने लवंगा चिकटवल्या
अमित शर्माने त्याच्या कारवर संपूर्ण भागाला फटाक्यांच्या माळा चिपकवल्या होत्या. गाडीवर फटाके ठेवल्यानंतर त्या वाजून नेमकं काय घडते याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी अमित शर्माने हा व्हिडिओ बनवला होता. त्यासाठी चारी बाजूंनी ड्रोन कॅमेरे ठेवले होते.
अमितने आपला साथीदारांना सोबत घेऊन गाडीवर पाच हजार, दहा हजार फटाक्यांच्या माळा लावल्या होत्या. केवळ कारच्या काचांवर फटाके लावण्याची खबरदारी त्यांनी घेतली होती. कारवर चिटकवलेला फटाका फोडण्यासाठी अमित शर्माने रिमोटचा वापर केला होता.
फटाके लावल्यानंतर रिमोटने पेटवले
अमित शर्माने रिमोटचा वापर करून कार पेटवली. एक लाख फटाके कसे पेटवले गेले, हे पाहण्यासाठी अमित शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ड्रोन कॅमेरे, गो-प्रो कॅमेरे लावले होते. फटाक्यांची आतषबाजी होताच बराच वेळ धमाक्याचा आवाज येत होता.
गाडीचे बोनेट आणि बॅटरीला नुकसान नाही
फटाके फुटल्यानंतर कारच्या सर्व खिडक्या पांढर्या शुभ्र दिसत होत्या. गाडीच्या बोनेटचेही फार नुकसान झालेले नाही. कारची बॅटरी एकदम व्यवस्थित होती. कारच्या पेंटवर बबल तयार झाले होते.
फटाके फोडल्यानंतरही गाडी चालवण्याचा प्रयत्न
सर्व फटाके फोडल्यानंतर अमित शर्माने गाडी चालवण्याचा प्रयत्न केला. आधी गाडी सुरु झाली नाही, पण नंतर काही वेळाने पुढे गेली. मात्र नंतर ती पुन्हा बंद झाली.