“वो लड़की है कहा?” या चित्रात एक स्त्री लपलीये, कुठे आहे? सांगा
असंच हे एक चित्र आहे ज्याचं उत्तर तुम्हाला आलं तर तुम्हालाच तुमचा अभिमान वाटणार आहे.

इंटरनेटवर अनेक कोडी आहेत. लोकांनाही ही कोडी सोडविण्यात भरपूर मजा येते. बऱ्याच लोकांना हे बघताना असं वाटतं की, “श्या! हे? हे तर आम्ही 2 मिनिटांत सोडवू!” पण प्रत्यक्षात असं होत नाही. खूपच कमी लोकं ही कोडी, हे ऑप्टिकल भ्रम सोडवू शकतात. फार कमी लोकांचं डोकं त्या दिशेने काम करतं. योग्य वेळी उत्तर देऊ शकणारे फार कमी लोक आहेत. असे भ्रम आपल्याला गोंधळून टाकतात. पण जेव्हा आपल्याला उत्तर येतं तेव्हा आपल्याला फार अभिमान वाटतो. असंच हे एक चित्र आहे ज्याचं उत्तर तुम्हाला आलं तर तुम्हालाच तुमचा अभिमान वाटणार आहे.
इंटरनेटवर नवीन आणि आश्चर्यकारक ऑप्टिकल भ्रम आलेत. ज्यात चित्रकलेत दडलेलं गुपित शोधावं लागतं. या चित्रात पण काहीतरी लपलंय.
सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन जोरदार व्हायरल होत असून अनेक जण हे चॅलेंज स्वीकारत आहेत. मात्र हे ऑप्टिकल भ्रम खूप कठीण असून या ऑप्टिकल भ्रमात स्त्री शोधण्यात अनेकांना अपयश आल्याचे अनेकांनी सांगितले.
पेंटिंग नीट पाहा आणि ती स्त्री कुठे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा, कारण पहिल्यांदा तुम्हाला एक मांजर दिसेल जिने उंदराला तोंडाने धरलेलं आहे.
एकदम नीट बघा, मन आणि डोकं शांत ठेवा. तुम्हाला ती स्त्री दिसेल. आपल्याला फक्त 9 सेकंदात पेंटिंगमध्ये लपलेल्या स्त्रीला शोधायचं आहे.
हे सुंदर चित्र म्हणजे अर्मेनियाचा कलाकार अर्तुश वोस्कॅनियन याची निर्मिती आहे, जो अतिवास्तववाद या विषयावर चित्रे बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.
यात आपण पाहू शकता की स्वयंपाकघरातील शेल्फच्या शीर्षस्थानी एक मांजर बसली आहे जिथे तिने तिचे आवडते अन्न चोरण्याचा प्रयत्न करीत असलेल्या उंदीराला पकडले.
अतिवास्तववाद ही पहिल्या महायुद्धानंतर विसाव्या शतकात कला आणि साहित्य क्षेत्रात विकसित झालेल्या तंत्रांच्या उद्देशाने सुरू झालेली एक चळवळ आहे, ज्याद्वारे मन स्वत:ला व्यक्त करू शकते.
बरं तुम्ही जर या चित्राला नीट निरखून पाहिलंत तर तुम्हाला कळेल, छुपी स्त्री चित्राच्या डाव्या बाजूला नसून उजवीकडे आहे. दिसली?