अंबानी आणि अदानी यांनी यंदाही कमावलं, पण बाकीच्या उद्योजकांनी गमावलं
जगातील श्रीमंतांच्या यादीत नंबर एकवर राहिलेला एलोन मस्कची संपत्ती कमी झाली आहे, सध्या संपत्ती गमावण्याच्या यादीत त्यांचा प्रथम क्रमांक आहे.
मुंबई : भारत आणि आशियातील सर्वात मोठे श्रीमंतांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यामध्ये गौतम अदानी आणि अनिल अंबानी यांचा टॉप 10 मध्ये समावेश आहे. मात्र, बरेच उद्योजकांचे नावे यामध्ये आलेली नाही, त्यामुळे अदाणी आणि अंबानी यांनी कमावले आणि इतरांनी गमावले अशी स्थिती सध्या बघायला मिळत आहे. या वर्षी जगातील अव्वल अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत भारतातील गौतम अदानी आणि मुकेश अंबानी वगळता सर्वांची संपत्ती कमी झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार अदानी समुहाचे चेअरमन गौतम अदाणी संपत्तीत यावर्षी 56.4 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ते एकूण 133 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये केवळ अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. तर यावर्षी सर्वाधिक संपत्ती गमावण्याच्या यादीत एलोन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत.
जगातील श्रीमंतांच्या यादीत नंबर एकवर राहिलेला एलोन मस्कची संपत्ती कमी झाली आहे, सध्या संपत्ती गमावण्याच्या यादीत त्यांचा प्रथम क्रमांक आहे.
यामध्ये टेस्ला आणि स्पेसएक्स ची संपत्तीत मोठी घट झाली आहे. 89.7 बिलियन डॉलरने घट झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्यांची एकूण संपत्ती ३३५ अब्ज डॉलरवर पोहोचली होती.
या यादीतील पुढचे नाव मेटाचे आहे, ही कंपनी फेसबूकची मूळ कंपनी असून तीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचे आहे, ज्यांची एकूण संपत्ती $82.9 बिलियनने कमी झाली आहे.
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीत यावर्षी ७४.३ अब्ज डॉलरची घट झाली आहे. असून हे देखील कधीकाळी टॉप 10 च्या यादीत राहिलेली व्यक्ती आहे.
फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट 157 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह श्रीमंतच्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती 20.6 अब्ज डॉलर आहे.
याशिवाय बेझोस यांची ही एकूण संपत्ती 118 अब्ज डॉलर आहे आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. गुरुवारी त्यांची एकूण संपत्ती 2.26 अब्ज डॉलरने घसरली आहे.
या श्रीमंताच्या यादीत मात्र भारतातील अदाणी आणि अंबानी यांचे नाव कायम असून अदाणी यांच्या संपत्तीत मात्र वाढ झाली आहे.