Optical Illusion | या चित्रात French Fries शोधून दाखवा!
पूर्वी कोडी ऑफलाईन असायची म्हणजे एखादा माणूस तोंडी कोडी विचारायचा आणि आपण ती उत्तरे लगेच, तिथेच तोंडी द्यायचो. आता काळ बदलला, वेळ बदलली. आता ही कोडी ऑनलाइन आलीत ज्याला आपण ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम म्हणतो. हे वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध असतात, सराव असल्यास याचं उत्तर आपल्याला लवकर सापडू शकतं. चला या कोड्याचं उत्तर द्या!
मुंबई: ऑप्टिकल इल्युजनचं उत्तर शोधायला ते कमी वेळात शोधायचं असतं त्यामुळे त्याचा सराव असणं सगळ्यात महत्त्वाचं. सरावासाठी काय करणार? सध्या ऑप्टिकल इल्युजनची चित्रे प्रचंड व्हायरल होतायत यातलं एक चित्र रोज सोडवून पाहिलं तरी तुमचा सराव होऊ शकतो. आपण लहानपणी कोडी सोडवायचो हीच कोडी आता ऑनलाइन आलेली आहेत. काही अभ्यासकांच्या मते तुमचं व्यक्तिमत्त्व जर ओळखायचं असेल तर ऑप्टिकल इल्युजनची मदत होऊ शकते. याचं उत्तर शोधायला तुमचं निरिक्षन कौशल्य चांगलं असायला हवं. चित्र जर नीट निरखून पाहिलं तर तुम्हाला याचं उत्तर आरामात मिळू शकतं. आता या दिलेल्या चित्रात तुम्हाला फ्रेंच फ्राईज शोधायचे आहेत. अट एकच आहे, मोजून दहा सेकंदात हे फ्रेंच फ्राईज शोधून दाखवायचे आहेत.
फ्रेंच फ्राईज शोधा
हे उत्तर शोधण्याआधी तुम्हाला फ्रेंच फ्राईज काय आहेत हे माहिती असायला हवं? तुम्हाला ते काय असतात, कशापासून बनवले जातात, कसे दिसतात माहित आहे का? कारण याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला फ्रेंच फ्राईज ओळखू यायला हवेत. पिवळ्या रंगाचे, बटाट्यापासून बनवले जाणारे फ्रेंच फ्राईज अनेक लोकांना आवडतात. या चित्रात मोबाईल, चावी, टीशर्ट अशा अनेक गोष्टी आहेत. यात तुम्हाला फ्रेंच फ्राईज शोधायचे आहेत.
उत्तर खाली
एका पांढऱ्या पॅकेटमध्ये पिवळ्या रंगाच्या स्टिक्स तुम्हाला दिसतायत का बघा? या चित्रात अनेक गोष्टी आहेत त्यामुळे फ्रेंच फ्राईज शोधणे जरा कठीण आहे. अशक्य वाटेल पण शक्य आहे. चला हे चित्र नीट निरखून बघा, डावीकडून उजवीकडे, वरून खाली एक एक वस्तू पटापट बघून टाका. आता तरी तुम्हाला फ्रेंच फ्राईज दिसलेत का? आधी आठवा फ्रेंच फ्राईज कसे दिसतात आणि या चित्रातील एक-एक वस्तू बघा, तुम्हाला याचा उत्तर नक्की सापडेल. फ्रेंच फ्राईज दिसले असतील तर अभिनंदन! तुमचं निरीक्षण चांगलं आहे. जर फ्रेंच फ्राईज दिसले नसतील तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.