Optical Illusion | या चित्रात एकूण किती प्राणी दिसतायत?
या चित्रात तुम्हाला किती प्राणी दिसत आहेत हे सांगायचे आहे. असो, ऑप्टिकल इल्युजन्सचे सौंदर्य हे आहे की ते आपल्या डोळ्यांची आणि मेंदूची फसवणूक करण्यासाठी ओळखले जातात. अशा प्रतिमाआपल्याला जे दिसतं तेच सत्य आहे, असं आपल्याला पटवून देतात, पण तसं अजिबात नसतं.

मुंबई: प्रकाशीय भ्रमात अनेक प्रकारची चित्रे असतात. काही चित्रे अशीही आहेत ज्यात आपल्याला एका चित्रात किती प्राणी आहेत हे शोधावे लागेल. इथे एक पूर्णपणे नवीन प्रकारचे चित्र समोर आले आहे. या चित्रात तुम्हाला किती प्राणी दिसत आहेत हे सांगायचे आहे. असो, ऑप्टिकल इल्युजन्सचे सौंदर्य हे आहे की ते आपल्या डोळ्यांची आणि मेंदूची फसवणूक करण्यासाठी ओळखले जातात. अशा प्रतिमाआपल्याला जे दिसतं तेच सत्य आहे, असं आपल्याला पटवून देतात, पण तसं अजिबात नसतं.
खरं तर या चित्रात काही प्राणी आहेत. ज्यामध्ये अस्वल सर्वप्रथम दिसून येते. अस्वल सर्वात मोठे आणि तो एकच प्राणी आहे असं वाटतं पण त्यामागे किती तरी प्राणा आहेत. हे ऑप्टिकल इल्युजनचे हे चित्र मनाला चटका लावणारे चित्र आहे. इतकंच नाही तर एखाद्या चित्राविषयी संवाद साधताना आपला मेंदू कसा काम करतो हे समजून घेण्यास ऑप्टिकल इल्युजन शास्त्रज्ञांना मदत करतात.
या फोटोची गंमत म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सारखा दिसणाऱ्या या फोटोमध्ये सर्व प्राणी दिसत नाहीत. अस्वलाच्या मागे अनेक छोटे प्राणीही असल्याचे चित्रात दिसत आहे. परंतु सर्व प्राण्यांमध्ये किती नेमकी किती प्राणी आहेत याचा अंदाज बांधता येत नाही. जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर ठीक जर नसेल सापडलं तर…
या चित्रात प्रत्यक्षात सहा प्राणी आहेत. यामध्ये अस्वल, कुत्रे, मांजर, वटवाघूळ, माकडे आणि खारूताई यांचा समावेश आहे. अस्वल पुढे उभे आहे. तर त्याच्या मागे इतर प्राणी असून अस्वलाच्या शेपटीवर खारूताई आहे. सर्व प्राणी दिसत नाहीत, पण नीट पाहिल्यावर कोणते आणि किती प्राणी आहेत हे कळते.