हे कोडं सोडवा! या चित्रात सरळ लिहिलेला 24 हा अंक शोधून दाखवा
कोडे सोडवण्यासाठी निरीक्षण कौशल्य चांगलं लागतं. आपण असे कोडे लहानपणी सोडवायचो, आता हे कोडे ऑनलाइन उपलब्ध असतात. पूर्वी कोड्यांचा प्रकार ऑनलाइन नव्हता, तोंडी होता. तोंडी कोडी घालताना बंधनं यायची. आता ऑनलाइन पद्धतीत ही कोडी अनेक प्रकारे दिसून येतात.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचे कोडे असते. हे कोडे सोडवणे खूप अवघड असते. असे चित्र पाहिलं की आधी तर माणूस गोंधळून जातो. यात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं सुद्धा कठीण होऊन बसतं. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम म्हणजेच कोडे! अभ्यासक सांगतात की ऑप्टिकल इल्युजन लोकांचं व्यक्तिमत्त्व कसं आहे ते सांगतात. यात कधी आपल्याला लपलेली वस्तू शोधायची असते, कधी आधी काय दिसतं ते सांगायचं असतं तर कधी चुकलेलं स्पेलिंग, गोष्टींमधला फरक शोधायचा असतो. अशाच पद्धतीने माणसाचं व्यक्तिमत्त्व ओळखलं जाऊ शकतं. ऑप्टिकल इल्युजनची चित्रे सध्या खूप व्हायरल होतायत. किचकट चित्रांमधील उत्तर जर शोधायचं असेल तर याचा सराव असायला हवा.
सरळ लिहिलेला 24 नंबर शोधून काढा
आता हे चित्र बघा. हे चित्र बघून आधी तुमचा गोंधळ उडेल कारण या चित्रात 24 नंबर हे उलटे लिहिलेले आहेत म्हणजे कदाचित हे चित्र आपण मोबाईल/ स्क्रीन उलटी करून पाहिलं तर आपल्याला हे नंबर्स सरळ दिसतील. मग यात कोडे काय आहे? कोडे हे आहे की यात तुम्हाला सरळ लिहिलेला 24 नंबर शोधून काढायचा आहे. विशेष म्हणजे हा नंबर तुम्हालामोजून दहा सेकंदात शोधायचा आहे.
एक एक ओळ तपासा…
जर तुमचं निरीक्षण चांगलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच सापडेल. ऑप्टिकल इल्युजन सोडवायचा जर सराव असेल तर उत्तर लगेच सापडू शकते. तुमच्यापैकी काही हुशार लोकांना याचं उत्तर सापडलं सुद्धा असेल. आम्ही सांगतो अशा चित्रांमध्ये उत्तर कसं शोधायचं. नीट निरखून बघा, डावीकडून उजवीकडे, वरून खाली, खालून वर, एक एक ओळ तपासा. गोंधळून न जाता मन एकाग्र ठेवा आणि प्रश्न काय आहे ते लक्षात ठेवा.
उत्तर खाली देत आहोत
तुम्हाला उत्तर सापडलंय का? तुमच्या उजव्या हाताला जरा एकदा नजर टाका, दिसला? गोंधळून गेलात तर उत्तर कधीच सापडणार नाही. मन शांत ठेवावं लागेल. जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर तुमच्या इतकं हुशार कुणीच नाही. पण जर तुम्हाला हे उत्तर शोधणं कठीण वाटत असेल तर काळजी करू नका आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.