Optical Illusion | हे चित्र बघा, यात मगर शोधून दाखवा!
ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचे कोडे असते. हे कोडे सोडवण्यासाठी तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं असायला हवं. ऑप्टिकल इल्युजन तुमची परीक्षा घेतं. हे कोडे सोडवताना मेंदूचा व्यायाम होतो. ऑप्टिकल भ्रम हा एक भ्रमच असतो, जो सोडवण्यासाठी माणूस प्रचंड हुशार लागतो. आता जर तुम्हाला याची उत्तरे येत असतील तर तुम्ही हुशार आहात. जर तुम्हाला याची उत्तरे येत नसतील तर मग तुम्हाला ऑप्टिकल इल्युजन सोडवण्याचा सराव करणे खूप गरजेचं आहे.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन आपण लहानपणी तोंडी सोडवायचो. आता आपण ही कोडी ऑनलाइन सोडवतो. ही कोडी खूप किचकट असतात. या कोड्यांची उत्तर सोडवण्यासाठी तुमचं निरीक्षण चांगलं असायला हवं आहे. ऑप्टिकल इल्युजनमध्ये खूप प्रकार असतात. कधी आपल्याला यात एखादी लपलेली वस्तू शोधायची असते तर कधी एखादा प्राणी, पक्षी शोधायचा असतो. दोन चित्रांमधील फरक सुद्धा आपल्याला यात शोधावा लागतो. विशेष म्हणजे यातलं उत्तर आपल्याला लवकरात लवकर शोधायचं असतं. ऑप्टिकल भ्रम मध्ये जे प्रथमदर्शनी दिसतं तेच खरं असतं असं नसतं, सत्य काहीतरी वेगळंच असतं आणि म्हणूनच याला भ्रम असं म्हणतात. आता हे जंगलाचं चित्र बघा. हे चित्र प्रचंड व्हायरल झालंय. यात तुम्हाला मगर शोधायची आहे. दिसतीये का?
मगर शोधा
तुम्हाला यात मगर दिसतेय का? ऑप्टिकल इल्युजनच्या प्रकारात चित्रातील चेहरे शोधणे आणि चित्रातील प्राणी शोधणे खूप कठीण असतं. कारण अशा प्रकारात जे उत्तर आपल्याला शोधायचं असतं ते उत्तर या चित्रात मिसळळेलं असतं. आता तुम्हाला या चित्रात मगर शोधायची आहे पण ती शोधणं इतकं कठीण का असतं? मगरीचा रंग जंगलात अशा पद्धतीने मिसळला गेलाय की ती मगर शोधणं कठीण जातंय. या चित्रात तुम्हाला एक नदी दिसेल, बघून असं लक्षात येईल की नदी किनारी खूप झाडी आहेत. नारळाची झाडं आहेत, किनाऱ्यावर जराशी माती दिसतेय, दगड दिसतायत. यात तुम्हाला मगर शोधायची आहे.
आम्ही या प्रश्नाचं उत्तर खाली देत आहोत
तुम्हाला आता तरी तुम्हाला मगर दिसतेय का? चित्र नीट बघा, डावीकडून उजवीकडे बघा, वरून-खाली नीट बघा. तुम्हाला मगर कशी दिसते ते माहित आहे ना? कारण ऑप्टिकल इल्युजन सोडवताना आपण काय शोधतोय आणि ते कसं दिसतं हे माहिती असायला हवं. जर तुम्ही कधी मगर पाहिली तर तुमच्यासाठी मगर शोधणं सोपं आहे. एव्हाना तुम्हाला मगर दिसली सुद्धा असेल. जर तुम्हाला मगर दिसली असेल तर अभिनंदन! तुमचं निरीक्षण चांगलं आहे. जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं नसेल तर नाराज होऊ नका आम्ही या प्रश्नाचं उत्तर खाली देत आहोत.