Optical Illusion | रंगीबेरंगी पोपटांमध्ये सरडा शोधून दाखवा! दिसतोय का सांगा?
Optical Illusion या चित्रात डावीकडून उजवीकडे बघा, उजवीकडून डावीकडे बघा, वरून खाली बघा...सरडा दिसलाय का? सरड्याचा आकार अर्थातच पोपटापेक्षा वेगळा असतो. आता हे चित्र रंगीबेरंगी असल्याने तुम्ही आधी गोंधळून जाल पण डोकं शांत आणि मन एकाग्र केल्यावर तुम्हाला सरडा दिसेल.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हा खूप किचकट प्रकार असतो. लहानपणी आपण जी कोडी सोडवायचो तीच कोडी आता ऑनलाइन आलीयेत, याच कोड्यांना ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. यात अनेक प्रकार असतात, कधी आपल्याला यात शब्द शोधायचा असतो, कधी अंक, कधी लपलेला प्राणी तर कधी लपलेला पक्षी. कधी कधी तर चक्क चेहरे सुद्दा शोधायला सांगितले जातात. निरीक्षण कौशल्य चांगलं असणाऱ्या व्यक्तीला ऑप्टिकल इल्युजन सोपं जातं. रोज जर एक ऑप्टिकल इल्युजन सोडवलं तर याचा सराव होतो आणि नेमकं उत्तर कुठे शोधायचं हे कळतं. आता हे चित्र बघा, यात तुम्हाला रंगीबेरंगी पोपट दिसतील. यातच तुम्हाला सरडा शोधायचा आहे. जर तुम्ही नीट निरखून पाहिलं तर तुम्हाला सरडा लगेच दिसेल.
तुम्हाला यात सरडा दिसलाय का?
तुम्हाला यात सरडा दिसलाय का? या चित्रात तुम्हाला सरडा शोधायला सांगितलाय. तुम्हाला हा सरडा दिसलाय का? इथे रंगीबेरंगी पोपट आहेत, या पोपटांमध्ये कुठेतरी सरडा पण आहे. या चित्रात डावीकडून उजवीकडे बघा, उजवीकडून डावीकडे बघा, वरून खाली बघा…सरडा दिसलाय का? सरड्याचा आकार अर्थातच पोपटापेक्षा वेगळा असतो. आता हे चित्र रंगीबेरंगी असल्याने तुम्ही आधी गोंधळून जाल पण डोकं शांत आणि मन एकाग्र केल्यावर तुम्हाला सरडा दिसेल.
उत्तर खाली देत आहोत
तुम्हाला यात सरडा दिसलाय का? आम्ही सांगतो उत्तर कसं शोधायचं. यात अनेक रंग आहेत. सरडा शोधताना तुम्ही रंगावर नाही आकारावर लक्ष द्या. तुम्हाला यासाठी सरड्याचा आकार माहिती असायला हवा. सरड्याचा आकार, सरडा कसा दिसतो हे माहिती असणाऱ्याला सरडा दिसेल. ज्याला सरडा कसा दिसतो हे माहित नसेल त्याने पोपटांमध्ये कुठला वेगळा आकार दिसतोय का ते बघावं. आता तरी तुम्हाला याचं उत्तर दिसलंय का? तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन, नसेल सापडलं तर काळजी करू नका आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.