Optical Illusion | या आजोबांची बायको तुम्हाला कुठे दिसतेय का बघा, शोधून दाखवा!
कधी या चित्रात आपल्याला लपलेली गोष्ट शोधायची असते, कधी या चित्रात आपल्याला सर्वात आधी काय दिसतंय हे सांगायचं असतं तर कधी आपल्याला यातला फरक शोधायचा असतो. यात बरेच प्रकार आढळून येतात. आपल्याला सुद्धा हे कोडे सोडवताना मजा येते.

मुंबई: ऑप्टिकल भ्रम! सध्या इंटरनेट वर हे प्रचंड व्हायरल होतंय. ऑप्टिकल भ्रम म्हणजेच ऑप्टिकल इल्युजन हा एक प्रकारचा मेंदूचा व्यायाम आहे. आपल्याला यात वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. कधी या चित्रात आपल्याला लपलेली गोष्ट शोधायची असते, कधी या चित्रात आपल्याला सर्वात आधी काय दिसतंय हे सांगायचं असतं तर कधी आपल्याला यातला फरक शोधायचा असतो. यात बरेच प्रकार आढळून येतात. आपल्याला सुद्धा हे कोडे सोडवताना मजा येते. पण गंमत अशी असते की आपल्याला कोड्याचं उत्तर एकदम कमी वेळात शोधायचं असतं. अगदी काही सेकंदात!
हे चित्र बघा, प्रश्न असा आहे की या चित्रात तुम्हाला या माणसाची बायको शोधायची आहे. या चित्रात एक म्हातारा माणूस दिसतोय. हा माणूस काठी घेऊन उभा आहे. यात तुम्हाला या माणसाची बायको शोधायची आहे. याचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर शोधायचं आहे. तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की सापडेल. चित्र पाहताना तुम्हाला लक्षात येईल की हा म्हातारा सुद्धा त्याच्या बायकोला शोधतोय. तुम्हालाही त्याची बायको अवघ्या 9 सेकंदात शोधून दाखवायची आहे.

spot the wife of this man
जरा एकदा तुमची नजर पाठीमागे असणाऱ्या गवतावर फिरवा, तिथे तुम्हाला काही दिसतंय का? नीट निरखून पहा. तुम्हाला उत्तर सापडलंय का? जर तुम्हाला हे उत्तर सापडलं असेल तर तुम्ही खरंच हुशार आहात. जर बरेच प्रयत्न करूनही तुम्हाला याचं उत्तर सापडलं नसेल तर आम्ही याचं उत्तर खाली लाल वर्तुळात दाखवतोय.

here is the wife of this man