Optical Illusion | या चित्रात h हे अक्षर शोधा!
ऑप्टिकल भ्रम म्हणजेच कोडे. या कोड्यांमध्ये तुम्हाला कधी अक्षर, कधी शब्द, कधी वस्तू शोधायची असते. ऑप्टिकल भ्रम म्हणजेच कोडे. आजकाल ही कोडी ऑनलाइन खूप व्हायरल होतायत. निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर लगेच मिळेल. ही कोडी खूप अवघड असतात. ज्या लोकांना याचं उत्तर सापडतं ती लोकं हुशार असतात. बघा आता तुम्हाला याचं उत्तर सापडतंय का?
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम म्हणजेच कोडे. लहानपणी आपण ही कोडी ऑनलाइन सोडवायचो आता ही कोडी ऑनलाइन आलीयेत. ऑप्टिकल भ्रम खूप किचकट असतात. या चित्रांना भ्रम का म्हणतात. आपण जेव्हा ही चित्रे बघतो तेव्हा आपल्याला जे प्रथमदर्शनी दिसतं तेच खरं असतं असं नाही. याचं वास्तव काहीतरी वेगळं असतं त्यामुळेच याला भ्रम म्हणतात. ऑप्टिकल भ्रम सोडवण्यासाठी निरीक्षण कौशल्य चांगलं लागतं. या चित्रांनी मेंदू चांगला चालतो म्हणजे हे चित्र सोडवताना मेंदूचा व्यायाम होतो. यामध्ये अनेक प्रकार येतात. यात कधी आपल्याला एखादी लपलेली वस्तू शोधायची असते तर कधी चुकीचं स्पेलिंग शोधायचं असतं तर कधी एखादी आकृती शोधायची असते. कधी कधी तर या किचकट चित्रांमध्ये चेहरा सुद्धा लपलेला असतो. आता हेच चित्र बघा, या चित्रामध्ये तुम्हाला एक अक्षर शोधायचं आहे. काय आहे ते अक्षर? बघुयात…
H शोधायचा आहे
या चित्रामध्ये तुम्हाला H हे अक्षर शोधायचं आहे. हे चित्र नीट बघा, या चित्रात तुम्हाला खूप अक्षरं दिसतील यात तुम्हाला H शोधायचा आहे. कर्सिव्ह भाषेत हे लिहिलेलं आहे. तुमच्यापैकी काहीजण इंग्लिश मिडीयमला असतील तर त्यांना या भाषेत H कसा दिसतो हे माहित असावं. हे काय फार अवघड नाही. हे चित्र गोंधळून टाकणारं आहे. एक-एक अक्षर नीट पाहिलं तर कदाचित तुम्हाला याचं उत्तर लगेच दिसेल. उत्तर दिसलंय का?
उत्तर खाली दाखवून देतो
जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! जर तुम्हाला याचं उत्तर दिसलं नसेल तर आम्ही सांगतो. वरून-खाली एक एक अक्षर बघत जा. डावीकडून उजवीकडे एक-एक अक्षर बघत जा या अक्षरांमध्ये H हे अक्षर सापडेल. हे अक्षर स्मॉल लेटर्स मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे H हे अक्षर h असं लिहिलेलं असेल. दिसलं? जर अजूनही तुम्हाला याचं उत्तर सापडलं नसेल तर तुम्हाला तुमचं निरीक्षण चांगलं करण्याची गरज आहे. तुम्हाला सरावाची गरज आहे. काळजी करू नका, आम्ही याचं उत्तर खाली दाखवून देतोय.