Viral : Challenge गेलं उडत, या पठ्ठ्यानं पाणीपुरी खाण्याची हौस मात्र पूर्ण करून घेतली; पाहा Funny video

Food funny video : पाणीपुरी (Panipuri)... नाव काढलं तरी सर्वांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. स्ट्रीट फूडमधला (Street food) सर्वात लोकप्रिय (Popular) पदार्थ... असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात पाणीपुरी खाण्याचं चॅलेंज दाखवण्यात आलंय.

Viral : Challenge गेलं उडत, या पठ्ठ्यानं पाणीपुरी खाण्याची हौस मात्र पूर्ण करून घेतली; पाहा Funny video
पाणीपुरी खाण्याचं चॅलेंज स्वीकारणारा तरूण
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 8:30 AM

Food funny video : पाणीपुरी (Panipuri)… नाव काढलं तरी सर्वांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. स्ट्रीट फूडमधला (Street food) सर्वात लोकप्रिय (Popular) पदार्थ… चटपटीत तिखट, आंबट-गोड अशा स्वादातली पाणीपुरी कोणाला आवडली नाही तरच नवल. या पाणीपुरीवर विविध प्रयोग होत असतात. त्याचे व्हिडिओ आपण पाहत असतो. आताही एक व्हिडिओ व्हायरल झालाय. आपला आवडता पदार्थ जर कुणी फुकट म्हणजेच विनामूल्य खाऊ घातला तर? मग तर आपल्या आनंदाला पारावार उरणार नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात पाणीपुरी खाण्याचं चॅलेंज दाखवण्यात आलंय. पण हे चॅलेंज देणारा आणि घेणारा दोघांचीही धमाल कशी उडते, ते पाहून आपल्या तोंडालाच नाही, तर हसून हसून डोळ्यांतूनही पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

‘मीच देईन 100 रुपये’

व्हिडिओमध्ये ज्याच्या हाती कॅमेरा आहे, तो पाणीपुरीच्या ठेल्याजवळ आहे. तिथं एक तरूण येतो. अजय असं त्या तरुणाचं नाव असतं. त्याला एक चॅलेंज दिलं जातं. 30 सेकंदांत 8 पाणीपुरी खायच्या असतात. हे चॅलेंज पूर्ण केल्यास 100 रुपये मिळणार असतात. मग तोही हे चॅलेंज स्वीकारतो. एवढंच नाही तर त्यावर तो म्हणतो, हे चॅलेंज पूर्ण न केल्यास मीच तुम्हाला शंभर रुपये देईल. मग हा अनोखा खेळ सुरू होतो. अजय नावाचा तरूण पाणीपुरी खाण्याची हौस तर भागवून घेतो, पण तो जिंकतो का? व्हिडिओ पाहून तुम्हालाही मजा येईल.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर फुडीज आओ (foodies aao) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. खाद्यपदार्थांसंबधीचे व्हिडिओ यावर अपलोड होत असतात. तर 21 फेब्रुवारीला अपलोड झालेल्या या पाणीपुरीच्या व्हिडिओला 3.8 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओला यूझर्स लाइक कसत आहेत. तर व्हिडिओप्रमाणेच मजेदार कमेंट्सही करत आहेत. (Video courtesy – foodies aao)

आणखी वाचा :

काहीही हां..! खाद्यपदार्थांवरचे विचित्र प्रयोग थांबता थांबेना, आता पाणीपुरीचा ‘हा’ Viral video पाहा

Food viral video : पाणीपुरीवर अत्याचार! यूझर्स म्हणतायत, हे पाहून भूकच गेली

मुलांमध्ये कधीही भेदभाव करू नका, आपल्या वागण्यातून काय संदेश देतेय ही चिमुरडी? Video viral

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.