बाजूला चित्ता असूनही घाबरत नाही हरीण, काय कारण? पूर्ण पाहा ‘हा’ Viral video

Wild animals video : जंगली प्राण्यांच्या झुंजीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी आश्चर्यकारक घडते ज्यावर आपला विश्वास बसणार नाही. एक चित्ता (Panther) आणि हरीण (Deer) यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral) झाला आहे.

बाजूला चित्ता असूनही घाबरत नाही हरीण, काय कारण? पूर्ण पाहा 'हा' Viral video
हरणाच्या जवळ जातो पण शिकार करत नाही चित्ताImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 8:30 AM

Wild animals video : जंगली प्राण्यांच्या झुंजीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जंगलात त्याच प्राण्यांची चालते, त्यांच्यामध्ये बळ किंवा शक्ती असते. इतर कमी ताकदीचे प्राणी मोठ्या किंवा शक्तीशाली प्राण्यांना बळी पडतात. आपण नेहमी पाहतो, की वाघ, सिंह, बिबट्या किंवा चित्ता यासारखे प्राणी अत्यंत घातक असतात. दूरवरूनही ते शिकार ओळखतात आणि काही क्षणात त्यांचा फडशा पाडतात. त्यांचा वेग इतका असतो, की बहुतेकवेळा शिकार पळून जाण्यात अपयशी ठरतो. साधारणपणे मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची शिकार करतात. हे प्राणी गवत खात असताना त्याच गवतात वाघ, सिंह, चित्त्यासारखे प्राणी दबा धरून बसलेले असतात. अचानक झडप घालतात आणि आपली पेटपूजा करतात. पण कधीकधी आश्चर्यकारक घडते ज्यावर आपला विश्वास बसणार नाही. एक चित्ता (Panther) आणि हरीण (Deer) यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral) झाला आहे.

हरीण घाबरत नाही

व्हिडिओमध्ये दिसत आहे, की हरीण गवत खात आहे. तो त्याच्या गाण्यामध्ये इतका गुंग आहे, की आजूबाजूला काय चालले आहे, याचेही त्याला भान नाही. तेवढ्यात अचानक एका बाजूने भयानक असा चित्ता येतो. तो हरिणावर झडप घालण्याचा प्रयत्न करतो. पण त्यात त्याला यश येत नाही. तर दुसरीकडे चित्त्याला पाहून हरीण थोडेही विचलित होत नाही. कारण काय असेल, तर त्या दोघांच्याही मध्ये कंपाऊंड आहे. एक जाळी आहे, ज्यामुळे हरणाला थोडीही भीती वाटत नाही.

यूट्यूबवर अपलोड

चित्ता खूप प्रयत्न करतो, पण त्याला यश येत नाही. आपण हे अनोखे दृश्य पाहतच राहतो. यूट्यूबवर हा व्हिडिओ मराठी मीडिया (Media Marathi) या चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यूझर्स पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहत आहेत. तुम्हालाही हा व्हिडिओ आवडेल.

आणखी वाचा :

Vultures : कोणत्यातरी गंभीर विषयावर बोलावण्यात आलीय तातडीची बैठक, पाहा गिधाडांचा Viral video

Video : ‘अशा’ नकला तर माणसंही करू शकणार नाहीत! पाहा, प्राण्यांचे मजेदार क्षण… एका क्लिकवर…

नोकरीतून निवृत्ती घेऊन शेतात पहिल्यांदाच गेल्यावर असं काहीतरी होणारच! पाहा अतरंगी Viral video

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.