AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: वाहतुकीवर लक्ष्य ठेवणाऱ्या सीसीटीव्ही पाहाणारा पोपट सोशल मीडियावर व्हायरल, मोठे डोळे करुन काय शोधतोय पाहा!

ब्राझिलमध्ये रस्त्यांवरील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर एक पोपट अचानक खोडसाळ खेळताना दिसला. आधी हा पोपट या कॅमेऱ्यावर येऊन बसतो आणि नंतर त्याला कॅमेऱ्यात काहीतरी विशेष असल्याचं जाणवतं.

Video: वाहतुकीवर लक्ष्य ठेवणाऱ्या सीसीटीव्ही पाहाणारा पोपट सोशल मीडियावर व्हायरल, मोठे डोळे करुन काय शोधतोय पाहा!
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात डोकावणारा पोपट
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 7:28 AM

सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे .ज्यामध्ये पोपट ट्रॅफिक कॅमेऱ्यावर फोटोबॉम्बिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ ‘कॅसी’ नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. याला आतापर्यंत 1,300 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कुठूनतरी उडत उडत हा पोपट या कॅमेऱ्यावर येऊन बसला. आणि त्याला या कॅमेऱ्यात काहीतरी विशेष वाटले, म्हणून तो कॅमेऱ्यात सारखं डोकावताना आपण पाहू शकतो. (Parrot watching CCTV targeting traffic in Brazil goes viral on social media. See what you are looking for with big eyes!)

पोपटाचं कृत्यं सीसीटीव्हीत कैद

ब्राझिलमध्ये रस्त्यांवरील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर एक पोपट अचानक खोडसाळ खेळताना दिसला. आधी हा पोपट या कॅमेऱ्यावर येऊन बसतो आणि नंतर त्याला कॅमेऱ्यात काहीतरी विशेष असल्याचं जाणवतं. तेव्हा तो वारंवार कॅमेऱ्यासमोर पाहत राहतो. काही सेकंदांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. 13 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक पोपट डोके उलटे करून कॅमेरामध्ये डोकावताना दिसत आहे. कदाचित या पोपटाला कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये स्वत:चाच चेहरा दिसत असल्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच पोपट सारखा या कॅमेऱ्यात डोकावून पाहाताना दिसतो.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by kassy cho (@kassy)

डोळे मोठे करुन कॅमेऱ्यात पाहाणारा पोपट

तुम्ही ट्रॅफिक पाहत असताना, पुढच्याच क्षणी एक पोपट अचानक कॅमेऱ्याचे दृश्य ब्लॉक करतो. या पोपटाची मान आणि मोठ मोठे डोळे कॅमेऱ्यासमोर येतात. सर्वात मजेदार गोष्ट तेव्हा घडते जेव्हा पोपटाचा चेहरा, त्याच्या मोठ्या डोळ्यांनी, कॅमेरामध्ये काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतो. तो पुन्हा कॅमेराच्या लेन्ससमोर येतो. हा पोपट या कॅमेऱ्यात काहीतरी शोधण्याचाच प्रयत्न करत असल्याचं आता नेटकरी म्हणत आहेत.

हेही पाहा:

‘हेरा फेरी’मधल्या ‘राजू’ची साईड पोज पुन्हा व्हायरल, नेटकऱ्यांमध्ये साईड पोझ फोटोचा ट्रेंड सुरु!

महिनाभरानंतर भेटल्यावर अनुपम खेर यांच्या आईने त्यांना शिव्या का घातल्या? पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ

 

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.