वेदनादायी..! क्षेपणास्त्रांमुळे इमारतींची झाली दुरवस्था, विचलित करतील Ukraineमधली ‘ही’ दृश्यं!

Russia Ukraine war : गेल्या 4 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूय. युक्रेनची स्थिती अतिशय वाईट आहे. येथे रशियन (Russian) सैन्य ठिकठिकाणी क्षेपणास्त्रे (Missiles) टाकत आहे, ज्यामुळे लोकांची घरे उद्ध्वस्त (Destroyed) होत आहेत.

वेदनादायी..! क्षेपणास्त्रांमुळे इमारतींची झाली दुरवस्था, विचलित करतील Ukraineमधली 'ही' दृश्यं!
उद्ध्वस्त झालेल्या घरांचा मलबा गोळा करताना युक्रेनियन नागरिकImage Credit source: @ipskabra/twitter
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 11:49 AM

Russia Ukraine war : गेल्या 4 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, त्यात हजारो सैनिक मारले गेल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून केला जात आहे. विशेषतः युक्रेनची स्थिती अतिशय वाईट आहे. येथे रशियन (Russian) सैन्य ठिकठिकाणी क्षेपणास्त्रे (Missiles) टाकत आहे, ज्यामुळे लोकांची घरे उद्ध्वस्त (Destroyed) होत आहेत. दोन देशांच्या युद्धात गरीब नागरिक चिरडले जात आहेत. रशियन सैन्य युक्रेनमध्ये खोलवर घुसले आहे आणि शहरांमध्ये कहर करत आहे. निवासी इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली जात असून, त्यामुळे इमारतींची दुरवस्था झाली आहे. अशा स्थितीत युक्रेनमधून एक अत्यंत वेदनादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक निवासी इमारतींच्या बाहेर त्यांच्या घरांचा ढिगारा गोळा करताना दिसत आहेत. हे दृश्य हृदय हेलावणारे आहे, लोकांनी पैसे जोडून कसे घर केले असेल आणि ते एका फटक्यात उद्ध्वस्त झाले असेल, याची कल्पना वेदनादायी आहे.

क्षेपणास्त्रांमुळे उंच इमारतींची स्थिती वाइट

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की क्षेपणास्त्रांमुळे उंच इमारतींची वाइट स्थिती झाली आहे आणि लोक बाहेर कचरा गोळा करताना दिसत आहेत. लाकूड, लोखंड उचलून वाहनांमध्ये ठेवले जात आहे. त्याचवेळी क्षेपणास्त्र हल्ल्यातून वाचलेली लहान मुले सैरभैर झालेली पाहताना अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. हे एक अतिशय वेदनादायक दृश्य आहे. ज्यांची घरे कुठलीही चूक नसताना उद्ध्वस्त होतात त्यांची वेदना तुम्ही समजू शकता.

ट्विटर हँडलवर शेअर

हा वेदनादायक व्हिडिओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की जिथे क्षेपणास्त्रे पडली, तिथे लोक आता त्यांच्या घरांचा ढिगारा गोळा करत आहेत, लहान मुले जवळच दिसत आहेत. युद्धाचा मुलांवर खूप परिणाम होतो. कोणत्याही मुलाने युद्धाचे दिवस पाहू नयेत आणि सर्व समस्यांवर शांततापूर्ण तोडगा निघावा, अशी इच्छा आहे.

‘अत्यंत हृदयद्रावक’

45 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे, तर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले, की दुर्दैवाने लाखो मुलांसाठी, युद्धाची भीषणता ही सामान्य इको-सिस्टम आहे, कारण त्यांनी याशिवाय दुसरे काही पाहिले नाही’, तर दुसऱ्या यूझरने लिहिले आहे, की हा एक हृदयद्रावक व्हिडिओ आहे.

आणखी वाचा :

Russia Ukraine War : युद्धासमयी एकटा पडला युक्रेन?, अद्याप अमेरिका व नाटोने केली नाही मदत! जाणून घ्या कारणं…

रशिया-यूक्रेनवरची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींकडे मदत मागितली, झेलेन्स्किचं ट्विट

Russia Ukraine War Video: रशियानं मिसाईल डागलं, कानठळ्या बसवणारा आवाज पण तरीही मजबूतीचं दुसरं नाव यूक्रेन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.