यांना तर उत्तर कोरियातच सोडलं पाहिजे, युक्रेनमधून सुटका झालेल्या विद्यार्थ्यांच्या उन्मादी वर्तनावर लोक भडकले

Russia Ukraine War : गेल्या पाच दिवसांपासून रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारतर्फे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झाला आहे. यात सुटलेले विद्यार्थी उन्मादी अवस्थेत दिसत आहेत.

यांना तर उत्तर कोरियातच सोडलं पाहिजे, युक्रेनमधून सुटका झालेल्या विद्यार्थ्यांच्या उन्मादी वर्तनावर लोक भडकले
सुटका झालेल्या काही विद्यार्थ्यांचा उन्मादImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 7:30 AM

Russia Ukraine War : गेल्या पाच दिवसांपासून रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. युक्रेन आणि रशियादरम्यान सुरू असलेल्या युद्ध संघर्षात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारतर्फे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलवली असून लवकरच केंद्रीय मंत्र्यांचं एक पथक युक्रेन शेजारील देशांमध्ये समन्वयासाठी जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हल्ले सुरू असून तेथे अडकलेल्या भारतीयांना शक्य तेवढ्या लवकर मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच आपल्या नागरिकांना भारतात आणले जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांकडूनही लवकर सुटका व्हावी, यासाठी भारत सरकारकडे याचना केली जात आहेत. त्यातच एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झाला आहे. यात सुटलेले विद्यार्थी उन्मादी अवस्थेत दिसत आहेत.

सोशल मीडियावर संताप

व्हायरल व्हिडिओमध्ये एका गाडीत काही विद्यार्थी दिसत आहेत. आपण पोलंडला जात असल्याचे ते सांगत आहेत. त्यातच ते हास्यविनोद करत ‘हमे बचा लिजिए’ अशी टर उडवत आहेत. काहीजण हसत आहेत. काहीजण ‘नो पॅनिक प्लिज’ असं म्हणताना दिसून येत आहेत. तर ‘नो मोअर युक्रेन’ असंही ते म्हणत आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये गंभीर परिस्थिती असताना अशाप्रकारे टर उडवणं अत्यंत लज्जास्पद असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होतेय.

आधी मदतीसाठी ओरडत होते, आता…

दीपक सारस्वत (Deepak saraswat) या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओबद्दल माहिती देताना संबंधित व्यक्तीनंही संताप व्यक्त केलाय. सर्वजण सधन घरातले वाटतात. मात्र त्यांच्यात कोणताही सेवाभाव दिसत नाही. गद्दारांची कुठे कमी आहे? आधी मदतीसाठी ओरडत होते. आता वाचवलं तर खिल्ली उडवतायत. अशांना तर उत्तर कोरियातच सोडावं, असा संताप व्यक्त होतोय. इतर अनेक यूझर्सही अशीच चीड व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा :

Russia Ukraine War : रशियाला रोखण्यासाठी युक्रेनचा मास्टर स्ट्रोक, जेलमधील कैदी उतरणार युद्धभूमिवर

Baba Vanga Prediction : सर्व काही वितळून जाईल बर्फासारखे मात्र…; बाबा वेंगांनी केली होती भविष्यवाणी

बेलारूसची रशियाला मदत; रशिया बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करणार? युक्रेनचे टेन्शन वाढले

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.