Neeraj Chopra : खाओ रोटी, पिओ चाय, टेन्शन को करो बाय-बाय, सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राकडून काही टीप्स
टोकिओ ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून नीरज चोप्रा स्टार बनल आहे. ऑलम्पिकमध्ये त्यांने केलेल्या कामगिरीमुळे देशातच नाही तर परदेशातही त्याचे लाखो चाहते तयार झाले आहेत. भालाफेकीसाठी आपला सर्वाधिक वेळ देणारे नीरज सोशल मीडियावरही चांगलेच एक्टिव्ह आहेत. आणि आपल्या चाहत्यांच्या ते कायम संपर्कात राहतात. नीरज यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, जो आता चांगलाच व्हायरल झाला […]
टोकिओ ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून नीरज चोप्रा स्टार बनल आहे. ऑलम्पिकमध्ये त्यांने केलेल्या कामगिरीमुळे देशातच नाही तर परदेशातही त्याचे लाखो चाहते तयार झाले आहेत. भालाफेकीसाठी आपला सर्वाधिक वेळ देणारे नीरज सोशल मीडियावरही चांगलेच एक्टिव्ह आहेत. आणि आपल्या चाहत्यांच्या ते कायम संपर्कात राहतात. नीरज यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, जो आता चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत त्यांनी तणावापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय सांगितला आहे. यानंतर सोशल मीडिया युजर्सकडून त्यांच्या साधेपणाचं कौतुक सुरु आहे. ( Photo of Neeraj Chopra eating tea and chapati, Neeraj’s tweet that it is a great way to relieve stress)
नीरज चोप्राने सोमवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला, ज्या फोटोमध्ये त्यांने तणावापासून मुक्ती कशी मिळवायची, याचा साधा-सोपा उपाय सांगितला. या फोटोमध्ये भालाफेक कऱणारे नीरज चहाचा ग्लास आणि हातात चपाती पकडलेला दिसतो. नीरज चोप्राने या फोटोवर कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, खाओ रोटी, पिओ चाय, टेंन्शन को करो बाय-बाय, म्हणजेच चहा प्या, चपाती खाली आणि टेन्शनला बाय बाय करा. नीरजची ही पोस्ट आता व्हायरल झाली आहे. बातमी लिहण्यापर्यंत या पोस्टला 82 हजाराहुन अधिक लाईक्स मिळालेले होते. हेच नाही तर तब्बल 5500 हून अधिक लोकांनी याला रिट्वीट केलं होतं. नीरज चोप्राचा साधेपणा लोकांना जास्त आवडला. त्यानंतर या पोस्टवर कमेंट्सचा पाऊसच पडला.
खाओ रोटी पियो चाय, टेंसन को करो बाय बाय ?☕️ pic.twitter.com/yTnboE9DOk
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) September 20, 2021
एका युजरने कमेंटमध्ये लिहलं, अखेर असली देसी मुलगा समोर आला, दुसऱ्या एका युजरनं लिहलं, कुणी इतकं क्युट कसं असू शकतं? याशिवाय एका युजरने सल्ला देताना म्हटलं, खूप छान, फक्त तुम्ही चपाती चहात बुडवून खा, भारी लागते. एका अजून युजरने लिहलं, याला म्हणतात देसी बॉय, लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.
नीरज चोप्राने टोकिओ ऑलम्पिकमध्ये भालाफेकीत गोल्ड मेडल पटकावलां होतं. त्यांनी 87.58 मीटरचा थ्रो करत गोल्ड आपल्या नावावर केलं. ऑलम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भालाफेकीत भारताला गोल्ड मिळालं. भारताने टोकिओ ऑलम्पिकमध्ये एकूण 7 मेडल पटकावले. सिंगल इव्हेंटमध्ये अभिनव बिंद्रानंतर गोल्ड मेडल जिंकणारा नीरज चोप्रा हा दुसराच खेळाडू आहे. 2008 मध्ये बिंद्राने बीजिंग ऑलम्पिकमध्ये रायफल शुटिंगमध्ये गोल्ड मेडल पटकावलं होतं.