Photographer Video | तुम्ही सुद्धा म्हणाल, “या लग्नात फोटोग्राफरचीच धमाल!” व्हिडीओ बघा…

Photographer हा सध्याच्या लग्नांमध्ये फार महत्त्वाचा भाग आहे. लग्नात बाकी काही असो किंवा नसो, फोटोग्राफर मात्र असायलाच हवा. ते स्वतः त्याच्या सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात. आजकाल तर फोटोग्राफर्स behind the scenes देखील टाकत असतात. हा व्हिडीओ असाच काहीसा आहे behind the scenes सारखा. एक फोटोग्राफर लग्नात काम करताना कसा नाचतोय बघा.

Photographer Video | तुम्ही सुद्धा म्हणाल, या लग्नात फोटोग्राफरचीच धमाल! व्हिडीओ बघा...
photographer dancingImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 5:17 PM

मुंबई: सोशल मीडियावर लग्नाशी निगडीत मजेशीर व्हिडिओ बघितले तर इथे लग्न एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नसतं. लग्नाची तयारी अनेक महिने अगोदरपासून सुरू होते. प्रत्येकजण यात सामील होतो. हा दिवस केवळ वधू-वरांसाठीच खास नसतो, तर मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक या सोहळ्याचा भरभरून आनंद घेतात. पण अनेक लग्नांमध्ये असं काही घडतं ज्याची आपल्यापैकी कुणीच कल्पना करू शकत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. स्टेजवर आपलं काम करत असताना फोटोग्राफरने एवढी धमाल केली की हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

मल्टीटास्किंग व्यक्ती

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ लग्नात उपस्थित असलेल्या डान्सचा आहे. जिथे एक व्यक्ती कॅमेऱ्याने शूट करताना व्हिडिओ बनवत असते. यावेळी हा कॅमेरामन आपलं काम करता करता नाचतोय. आश्चर्याची बाब म्हणजे हा माणूस शूट करता करता इतका सहज नाचतोय की त्याला नाचताना आणि काम करताना कसल्याच पद्धतीचा अडथळा येत नाहीये. माणसाचं हे टॅलेंट पाहून प्रत्येकजण म्हणतायत की हा मल्टीटास्किंग आहे.

खरोखरच कौतुकास्पद

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कॅमेरामन लग्नात शूट करण्यासाठी गेलाय. इथे तो एका नाचणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शूट करायला जातो तेव्हा तो स्वतः देखील नाचू लागतो. मंडळी हा साधासुधा नाचत नाही बरं का एकदम भारी नाचतो. समोरच्याला नाचताना बघून कदाचित त्याला स्वतःवर नियंत्रण राहिलं नसावं. ज्या पद्धतीने तो नाचतो ते खरोखरच कौतुकास्पद आहे.

कॅमेरामनसाठी मोठी कॉम्प्लिमेंट

@PunjabiTouch नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. एक लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पहिला असून लोक कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. या व्यक्तीने आपली डान्स ॲकॅडमी चालवावी, असे कोणी म्हटले तर एका युजरने लिहिले आहे. ही त्या कॅमेरामनसाठी मोठी कॉम्प्लिमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.