कोंबड्यांचा ट्रक उलटला, पळवापळवीसाठी नागरिकांची झुंबड, 300 कोंबड्यांची लूट

मध्य प्रदेशातील बडवानी भागात कोंबड्यांची वाहतूक करणारा पिक अप ट्रक अनियंत्रित झाल्याने उलटला.

कोंबड्यांचा ट्रक उलटला, पळवापळवीसाठी नागरिकांची झुंबड, 300 कोंबड्यांची लूट
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 3:23 PM

भोपाळ : ‘फुकट तिथे चिकट’ ही प्रवृत्ती सर्रासपणे पाहायला मिळते. माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला, तर मदतीऐवजी लूट होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मध्य प्रदेशातही कोंबड्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली, ती अपघातग्रस्तांची मदत करण्यासाठी नाही, तर कोंबड्या पळवून नेण्यासाठी. ट्रकमध्ये असलेल्या हजार कोंबड्यांपैकी अर्ध्या मृत्युमुखी पडल्या, तर 300 ते 400 कोंबड्यांची लूट झाली. (Pickup truck full of chickens overturned on the road people gathered to loot in Madhya Pradesh)

मध्य प्रदेशातील बडवानी भागात कोंबड्यांची वाहतूक करणारा पिक अप ट्रक अनियंत्रित झाल्याने उलटला. अपघातानंतर ट्रकमध्ये भरलेल्या काही कोंबड्यांचा दबून मृत्यू झाला. तर दरवाजे तुटल्याने काही कोंबड्यांना मोकळी वाट मिळाली आणि त्या रस्त्यावर आल्या.

घाबरलेल्या कोंबड्या जवळच्या शिवारात वाट फुटेल तिथे सैरावैरा पळत होत्या. कोंबड्यांच्या ट्रकला झालेल्या अपघाताचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. बघता-बघता परिसरातील नागरिक कोंबड्यांना पळवण्यासाठी घटनास्थळी जमा झाले. एकट्या वाहनचालकाचं गर्दीपुढे काही चालेना. कोंबड्या लुटण्यासाठी काही जण बाईकवर स्वार होऊन आले होते. हाताला लागतील तितक्या कोंबड्या धरुन नागरिक पसार झाले.

पिक अप चालकाच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मालेगावहून कोंबड्या खिलचीपूरला नेल्या जात होत्या. सेंधवा कुशलगड राज्य महामार्गावर असताना दोंडवाडा गावाजवळ एक गाय ट्रकसमोर आली. गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक उलटला. ट्रकमध्ये असलेल्या हजार कोंबड्यांपैकी 600 ते 700 मृत्युमुखी पडल्या, तर 300 ते 400 कोंबड्यांची लूट झाली.

संबंधित बातम्या :

कराडमध्ये चार पायाची कोंबडी सापडली!

(Pickup truck full of chickens overturned on the road people gathered to loot in Madhya Pradesh)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.