Tribute to Lata Mangeshkar : आदरांजली ‘अशी’ही; खडूच्या तुकड्यावर साकारली लता मंगेशकर यांची प्रतिमा, Video Viral
Tribute to Lata Mangeshkar : ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना लोक आपापल्या शैलीत आदरांजली वाहत आहेत. व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की, एक कलाकार (Artist) खडू(Chalk)च्या तुकड्यावर लता मंगेशकर यांची छोटी मूर्ती कोरताना दिसत आहे.
Tribute to Lata Mangeshkar : ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. रविवारी सकाळी वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर लोक त्यांना आपापल्या शैलीत आदरांजली वाहत आहेत. अनेक लोक त्यांनी गायलेली गाणी गाऊन त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत, तर त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. याच प्रकारात एका कलाकाराने लता मंगेशकर यांची अनोख्या पद्धतीने आठवण काढली. ती पाहिल्यानंतर सर्वजण त्या व्यक्तीच्या अनोख्या कलात्मकतेचे कौतुक करत आहेत. व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की, एक कलाकार (Artist) खडू(Chalk)च्या तुकड्यावर लता मंगेशकर यांची छोटी मूर्ती कोरताना दिसत आहे. अत्यंत सुंदर अशी ही प्रतिमा दिसत आहे.
यूझर्सना केले प्रभावित
एका छोट्या खडूवर साकारलेल्या या मूर्तीने सोशल मीडिया यूझर्सना प्रभावित केले आहे. या कलाकाराने ज्या सफाईने आणि वेगाने हे चित्र कोरले आहे ते नक्कीच अप्रतिम कौशल्याचे प्रतिक आहे. रिपोर्टनुसार, सचिन संघे असे या कलाकाराचे नाव सांगितले जात आहे.
ट्विटरवर शेअर
हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत 3 लाखांहून अधिक वेळा तो पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. सचिन संघे यांची कला लोकांना आवडली आहे.
मल्टीऑर्गन निकामी झाल्याने निधन
रविवारी लता मंगेशकर यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी 8.12 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्या 92व्या वर्षांच्या होत्या. मल्टीऑर्गन निकामी झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र 6 फेब्रुवारी रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
Humble tributes to legendary #LataMangeshkar Ji? A quick miniature sculpture of #LataDidi #OmShanti pic.twitter.com/c26MMv7gR0
— Sachin Sanghe (@SachinSanghe) February 6, 2022