मागच्या तीस वर्षांपासून कधीही खाली न बसलेली ‘स्टॅंडिंग वुमन’, पोलंडची जोआना क्लिच दुर्धर आजाराने त्रस्त
पोलंडमध्ये राहणाऱ्या जोआना क्लिचला हा दुर्धर आजार आहे. मागच्या 30 वर्षांपासून ती एका आजाराशी झुंज देत आहे.जोआनाचं वय सध्या 32 वर्षे आहे. मात्र ती मागच्या 30 वर्षांपासून खाली बसू शकलेली नाही.
मुंबई : सध्या जगातील प्रत्येक दुसरी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे सध्या काही पिढ्यान् पिढ्या चालत आलेले काही आजार आहेत तर काही नव्याने संशोधनातून समोर येत आहेत. आपण स्वासलंबी असावं, स्वत: ची कामं स्वत: करावीत, असं आपल्या सगळ्यांना वाटतं. पण आजारपणामुळे ते शक्य होत नाही. तुम्ही कधी अशी व्यक्ती पाहिली आहे का जी खाली बसत नाही तर कती केवळ उभी असते? नसेल तर ही बातमी वाचा कारण बसता न येणं हा एक गंभीर आजार आहे. त्या आजामुळेच एक महिला मागची 30 वर्षे जमीनीवर बसू शकलेली नाही.
पोलंडमध्ये राहणाऱ्या जोआना क्लिचला हा दुर्धर आजार आहे. मागच्या 30 वर्षांपासून ती एका आजाराशी झुंज देत आहे.जोआनाचं वय सध्या 32 वर्षे आहे. मात्र ती मागच्या 30 वर्षांपासून खाली बसू शकलेली नाही. जोआनाला स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी नावाचा आजार आहे.
जोआनाने तिच्या आजाराबद्दल सांगितलं आहे. “मला माझं आयुष्य केवळ झोपून आणि आजारपणाचं कारणण देत घालवायचं नाही तरमला माझ्या बळावर काहीतरी करून दाखवायचं आहे. पण मला याची कल्पना आहे की भविष्यात माझी प्रकृती आणखी बिघडणार आहे. पण सामान्य माणसाप्रमाणे जगण्याची माझी इच्छा मी कधीही सोडणार नाही. मी ते स्वप्न कायम बघत राहील. शिवाय मला काही तरी चांगलं काम करून दाखवायचं आहे”, असं ती म्हणाली.
जोआनाच्या आईने तिच्या या आजाराबाबत आणि तिच्याबाबत आपलं मत व्यक्त केलं. “जोआनाच्या जन्मापासूनच तिला हा आजार आहे. ज्यामुळे ती बसू शकत नाही. जोआनाचे नितंब आणि पाठीचा कणा त्यांच्या शरीराचे वजन सहन करू शकत नाही. स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी नावाच्या आजारामुळे तिला त्याच्या दैनंदिन कामासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं. जोआना वयाच्या 2 व्या वर्षी फक्त एकदाच बसली होती. त्यानंतर आजपर्यंत मला कधी बसता आले नाही. जर जोआनाला विचारलं की तिला आयुष्याकडून काय हवंय, तर तिचं उत्तर असेल की ती कोणत्याही आधाराशिवाय तिचं आयुष्य सामान्यपणे जगू शकेन एवढंच!”, असं जोआनाच्या आईने सांगितलं.