Video | भर लॉकडाऊनमध्ये नव्या जोडप्याची बुलेटवर सफर, पोलिसांनी पकडून ‘असं’ केलं स्वागत की व्हिडीओ व्हायरल

एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पोलिसांनी कोरोना नियमांचं पालन करणाऱ्या त्या जोडप्याला शाबासकी दिली आहे. (Police newly married couple video covid protocol)

Video | भर लॉकडाऊनमध्ये नव्या जोडप्याची बुलेटवर सफर, पोलिसांनी पकडून 'असं' केलं स्वागत की व्हिडीओ व्हायरल
panjab couple
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 8:31 PM

मुंबई : भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. पोलीस विनाकारण फिरणाऱ्यांची कसून चौकशी करुन त्यांना दंड करत आहेत. हे सर्व सुरु असतानाच एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पोलिसांनी कोरोना नियमांचं पालन करणाऱ्या या जोडप्याला शाबासकी दिली आहे. (Police congratulate to newly married couple for following covid protocols video viral)

पोलिसांनी त्या जोडप्यासोबत काय केलं?

व्हिडीओत आपल्याला पाहायला मिळतं की रस्त्याने जाणाऱ्या नवविवाहित जोडप्याला पोलिसांनी अडवलं आहे. कोरोना नियमांचं पालन करत दुचाकीवरुन घरी निघालेल्या नवविवाहित जोडप्याला पोलीस शाबासकी देतायत. कोरोना नियमांचं पालन केल्यामुळे दोघांनीही पोलिसांचे मन जिंकलं आहे. कदाचित याच कारणामुळे पोलिसांनी दोन हार आणून या नव्या जोडप्याचा सत्कार केला आहे. तसेच त्यांनी या नव्या जोडप्याला संसार नव्याने सुरु करण्यासाठी आशीर्वाद म्हणून काही रक्कमसुद्धा दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ पंजाब येथील असून त्याला आयपीएस ऑफिसर दिपांशू काबरा यांनी अपलोड केलं आहे.

व्हिडीओ लोकांना जाम आवडला

सध्याच्या कोरोनाकाळात पोलीस जीवाचं रान करताना दिसतायत. ते या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्याना चांगलाच धडासुद्धा शिकवत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस म्हणजे फार निष्ठूर असतात. त्यांना भावनांचा गंध नसतो असा अनेकांचा समज होतोय. मात्र, या व्हिडीओमध्ये पोलिसांनी कोरोना नियमांचे पालन करणाऱ्या या जोडप्याचे चांगले स्वागत केले आहे. त्यांनी या जोडप्याला मान सन्मान देऊन तसेच त्यांना पैसे देऊन पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पोलिसांच्या याच कृतीमुळे नेटकऱ्यांना हा व्हिडीओ अतिशय आवडला आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याला अनेकांनी लाईक केले आहे. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिले आहे.

इतर बातम्या :

Video | माकड-वाघामध्ये जीवन मरणाचा खेळ, व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा नेमकं काय घडतंय ?

Video | गजबजलेल्या रेल्वेस्थानकावर महिला पोलिसांचा धम्माल डान्स, व्हिडीओ व्हायरल

कोवळ्या वयात भर उन्हात सॉक्सविक्री, मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी मदत, सोशल मीडियावर अनेकांनी ठोकला सलाम

(Police congratulate to newly married couple for following covid protocols video viral)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.