टोळकी दंगलीत जग जाळायला निघाली त्यावेळेस वर्दी देवदूत झाली, नेत्रेश शर्माचं प्रमोशन, नेटकरी म्हणतात, ‘अजूनही माणुसकी जिवंत’

गुढीपाडव्याच्या दिवशी राजस्थानमधील करौलीमध्ये हिंसाचार उसळला. ठिकठिकाणी आगीच्या घटना घडल्या. या आगीत अनेक घरं आणि दुकानं, वाहनं जाळली गेली. या घटनेवेळी कॉन्स्टेबल नेत्रेश शर्मा तिथे होते त्यांनी आगीशी दोन हात करून एका कुटुंबातील लहान मुलाचा जीव वाचवला. त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले. त्यांच्या या कृती सर्वत्र कौतुक होतंय.

टोळकी दंगलीत जग जाळायला निघाली त्यावेळेस वर्दी देवदूत झाली, नेत्रेश शर्माचं प्रमोशन, नेटकरी म्हणतात, 'अजूनही माणुसकी जिवंत'
नेत्रेश शर्मा यांनी वाचवला चिमुकल्याचा जीव, सोशल मीडियावर कौतुक
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 12:51 PM

मुंबई : अनेकदा सर्वसामान्य लोक संकटात असताना पोलीस (Police) देवासारखे धावून येतात. नुकतंच राजस्थानमध्ये (Rajsthan) एक घटना घडली. यात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. राजस्थानमधील करौली (Karauli) भागात दोन दिवसांपुर्वी झालेल्या हिंसाचारात देवदूत बनून पोलिस अधिकाऱ्याने एका लहान मुलाचा जीव वाचवलाय. एकीकडे आगीचा भडका होत होता, अश्यात या आगीतून हा पोलीस लहान मुलाला आपल्या छातीशी कवटाळून त्याचा जीव वाचण्यासाठी प्रयत्न करत होता. नेत्रेश शर्मा (Netresh Sharma) असं या पोलीस कॉन्स्टेबलचं (Police Constable) नाव आहे. सोशल मीडियावर (Social Media Trending) शर्मा यांच्या कृतीचं तोंड भरून कौतुक होत आहे. एवढंच नव्हे तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajsthan CM Ashok Gehlot) यांनीही शर्मा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांच्या कामाचं कौतुक केलं. शिवाय त्यांना बढतीही दिली.

नेमकं काय घडलं?

गुढीपाडव्याच्या दिवशी राजस्थानमधील करौलीमध्ये हिंसाचार उसळला. ठिकठिकाणी आगीच्या घटना घडल्या. या आगीत अनेक घरं आणि दुकानं, वाहनं जाळली गेली. या घटनेवेळी कॉन्स्टेबल नेत्रेश शर्मा तिथे होते त्यांनी आगीशी दोन हात करून एका कुटुंबातील लहान मुलाचा जीव वाचवला. त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले. त्यांच्या या कृती सर्वत्र कौतुक होतंय.

मुख्यमंत्र्यांकडून फोनवरून कौतुक

कॉन्स्टेबल नेत्रश शर्मा यांच्या कामाचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीनी शर्मा यांना फोन करून कौतुक केलं. “आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. तुमच्या कृतीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे”, असं गहलोत म्हणालेत. शिवाय शर्मा यांना बढती देऊन कॉन्स्टेबलरून हेड कॉन्स्टेबल पद दिलं.

ट्विटरवर कौतुकाचा वर्षाव

ट्विटरवर शर्मा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अनेकांनी त्यांचं कौतुक करत त्यांच्या कार्याला सलाम ठोकलाय. अंधाराततील प्रकाश आहात. कठीण काळातील खरे मदत करणारे आहात, असं म्हणत त्यांच्या कामाचं कौतुक केलं जातंय. तर दुसऱ्याने मै खाकी हू म्हटलंय. हा सिनेमा नाही तर वास्तव आहे. तुमच्या कार्याला कडक सॅल्यूट असं आणखी एक नेटकरी म्हणाला आहे. तर काहींनी हा फोटो शेअर करत माणुसकी जिवंत असल्याचं म्हटलंय.

संबंधित बातम्या

Viral Video : आरश्याची कमाल! कुत्रा बनला स्वत:चाच दुश्मन, पाहा व्हीडिओ…

Viral Video : दोस्त असावा तर असा! गायींच्या गराड्यात श्वान बनला साथी, केलं चिमुकलीचं संरक्षण…

Viral Video : ‘चका चक’ गाण्यावरचा चिमुकलीचा व्हीडिओ व्हायरल, पाहून साराही म्हणेल, किती क्यूट…

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.