VIDEO | नाईट ड्युटीमध्ये पोलीस रील बनवत होते, दुसऱ्याच क्षणी…, व्हिडीओ झाला व्हायरल
Viral Video | सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तीन पोलिस अधिकारी दिसत आहे. बादशाहाच्या गाण्यावर पाहा काय करीत आहेत. तीन पोलिस अधिकारी वर्दीत आहेत. त्याचबरोबर त्याच्या एक्सप्रेशन पाहण्यासारख्या आहेत.
मुंबई : रील्सचे (Reels Videos) व्हिडीओ बनवून अनेकांना प्रसिध्द व्हाय़चं आहे. कारण चांगल्या ठिकाणी जाऊन अनेकांनी आतापर्यंत रिल्स तयार केले आहेत. त्याचबरोबर ते व्हायरल सुद्धा झाले आहेत. पोलिस अधिकारी सुध्दा रिल्स बनवण्यामध्ये अजिबात मागे नाहीत. त्याचे सुध्दा अधिक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर (social media) रोज असंख्य नवे व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर हसू आवरत नाही असे व्हिडीओ असतात. सध्या तीन पोलिस अधिकाऱ्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी इतकी भारी अॅक्टींग (Instagram reel) केली आहे, तो व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
रिल्समध्ये तीन पोलिस अधिकारी दिसत…
सध्या व्हायरल होत असलेल्या रिल्समध्ये तीन पोलिस अधिकारी दिसत आहेत. यावेळी ते बादशाहच्या गाण्यावर लिप्सिंग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तीन पोलिस अधिकाऱ्यांच्यामध्ये जो अधिकारी आहे, त्याचं नाव रविराज असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पोलिसांच्या ड्रेसमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी केलेली अॅक्टींग अनेकांना आवडली आहे. लोकांनी तिन्ही अधिकाऱ्यांची तारिफ केली आहे. हा व्हिडीओ १० दिवसापुर्वी शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत ७० लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर सहा लाखापेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती इंस्टाग्रामवरती हा व्हिडीओ raviraj0639 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अधिक लोकांनी पाहिला आहे आणि शेअर सुध्दा केला आहे. रवि राज नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्या बायोमध्ये एक्स टिकटॉकर म्हटलं आहे. याचा अर्थ असा होतो की, भारतात टीकटॉक बंद होण्यापुर्वी रवीराज टीकटॉक स्टार होते. अजूनही त्या व्हिडीओला लाईक, कमेंट आणि सुरुचं आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण त्या खाली कमेंट करीत आहे. एका यूजरने लिहिले की, ‘आम्ही हे करू, तुम्ही देश वाचवाल.’ दुसर्या यूजरने लिहिले की, ‘बाबाजींनी हे पाहिले तर त्यांना नोकरी गमवावी लागेल.’