Marathi News Trending Political Memes activists on Twitter has also told in the meme what the city of Surat is doing in all this poltical crisis
Political Memes: ट्विटवरच्या कार्यकर्त्यांचा नाद नाय! त्यांनीच सांगितलं फडणवीस खुश आहेत, सुरत शहराचा यासगळ्यात काय रोल
या सगळ्या राजकीय कालपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा सक्रिय झालेत. इंटरनेटवर लोकांनी मोठ्या प्रमाणात सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल शेअर केलंय. प्रचंड प्रमाणात गोष्टी व्हायरल होतायत.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आज पाच दिवस झाले आहेत. शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार दूर गावाहाटीत आहेत. मात्र या बंडामुळे महाराष्ट्रात शिवसैनिकांनी (Shivsena) रान पेटवलं आहे. शिवसैनिकांनी कुणाचं ऑफीस फोडलं. तर कुणाच्या पुतळ्यांची जाळपोळ केलीय. तर कुणाच्या पोस्टरला काळं फासलं आहे. एकनाथ शिंदेविरुद्ध मुख्यमंत्री ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) संघर्ष चांगलाच पेटला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. नवी मुंबईत जाळपोळ झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. खारघर येथे शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. एकनाथ शिंदेसह त्यांच्यासह गेलेल्या बंडखोर आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. गदारोळात सगळ्यांचं लक्ष लागलंय ते शिवसेनेकडे! पुढे नेमकं काय होतंय हा सर्वसामान्यांसमोर प्रश्नय! या सगळ्या राजकीय कालपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा सक्रिय झालेत. इंटरनेटवर लोकांनी मोठ्या प्रमाणात सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल शेअर केलंय. प्रचंड प्रमाणात गोष्टी व्हायरल होतायत. एक नजर टाकुयात व्हायरल गोष्टींवर…
1) कंगना राणावतचे मिम्स मोठ्या प्रमाणात शेअर होतायत