Video : लग्न आहे की सर्कस? क्वचितच पाहिलं असेल ‘असं’ भन्नाट Pre Wedding Photoshoot!

Pre Wedding Photoshoot : ट्विटरवर व्हायरल (Viral) होत असलेले हे प्री-वेडिंग फोटोशूट सोशल मीडियावर (Social media) चर्चेचा विषय बनले आहे. हा मजेशीर व्हिडिओ (Funny video) सोशल मीडियावर लोकांना चांगलाच हसवत आहे.

Video : लग्न आहे की सर्कस? क्वचितच पाहिलं असेल 'असं' भन्नाट Pre Wedding Photoshoot!
जोडप्याचं अनोख प्री-वेडिंग फोटोशूट
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 1:22 PM

Pre Wedding Photoshoot : आजकाल सोशल मीडिया हे एक असे माध्यम बनले आहे, ज्यामुळे लोकांना व्यक्त होण्याचे एक हक्काचे प्लॅटफॉर्म मिळाले आहे. आता ट्विटरवर व्हायरल (Viral) होत असलेले हे प्री-वेडिंग फोटोशूट सोशल मीडियावर (Social media) चर्चेचा विषय बनले आहे. हा मजेशीर व्हिडिओ (Funny video) सोशल मीडियावर लोकांना चांगलाच हसवत आहे. काही यूझर्सनी तर लग्न ही सर्कस बनल्याचे म्हटले आहे. बहुतेक विवाह पंडितजींनी नाही तर फोटोग्राफर्सनी केले आहेत. सध्या सोशल मीडियावर प्री-वेडिंग फोटोशूटचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसायला येईल. व्हायरल झालेला व्हिडिओ एका मंदिरात शूट केल्याचे दिसत आहे. जिथे कपल त्यांचे प्री-वेडिंग फोटोशूट करत आहे. यादरम्यान फोटोग्राफरने मुलाला द्यायला सांगितलेली पोज पाहून हसायलाच हवे.

ट्विटरवर व्हायरल

तुम्ही पाहू शकता, की मुलगी नृत्याच्या पोझमध्ये आहे, तर मुलगा हातावर उभा आहे. हे पाहिल्यानंतर तुम्ही विचार करत असाल की, अशी कोण पोज देते? हा व्हिडिओ मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर व्हायरल झाला आहे. मात्र, तो कुठला आहे, याबाबत माहिती नाही. हा व्हिडिओ चेतना नावाच्या ट्विटर यूझरने @Tall_Dreams या हँडलने शेअर केला आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओ पोस्टला सुमारे शंभर लोकांनी लाईक केले आहे, तर 1 हजारांहून अधिक व्ह्यूज आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचवेळी, लोक व्हिडिओवर त्यांच्या कमेंट्स नोंदवत आहेत.

‘लग्नानंतर मुलाचे असेच होते’

या व्हिडिओवर काही लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काही लोकांनी मंदिरात या फोटोशूटला मंजुरी कशी मिळाली, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरने म्हटले आहे, की भारतीय विवाह आजकाल सर्कसपेक्षा कमी नाही. त्याचवेळी आणखी एका यूझरने मजेशीर टोनमध्ये कमेंट करताना लिहिले आहे, की लग्नानंतर मुलाचे असेच होते. एकूणच या व्हिडिओवर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा :

Dancing traffic lights स्वत:च सांगत आहेत ‘आता पुढे जायचं नाही!’ Funny video viral

Pushpa fever : 1-2 नाही तर चक्क पाच भाषांतलं Srivalli song! ऐका फक्त एका क्लिकवर…

गाणं तर हिट झालं आता नृत्यही! Kacha badam गाण्यावर Bhuban Badyakarचा Dance video viral

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...