Priyanka Gandhi | कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान प्रियांका गांधींनी स्वतः हॉटेलमध्ये बनवला डोसा, दाखवली अनोखी स्टाइल, व्हिडिओ पाहून…
Priyanka Gandhi : राजकीय नेत्यांकडून एखादी कृती केल्यानंतर ती त्यांच्या चाहत्यांना अधिक आवडते, असं अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळालं आहे. सध्या कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रियांका गांधी यांची एक गोष्ट चांगलीचं व्हायरल झाली आहे.
कर्नाटक : राहूल गांधी आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचे देशभरात चाहते असल्यामुळे त्यांच्याकडून एखादी कृती केली, तर त्याचं कौतुक कार्यकर्ते करीत असतात. देशात ज्यावेळी एखाद्या राज्यात निवडणूक होणार असते, त्यावेळी असं चित्र पाहायला मिळतं. कर्नाटकमधील (Karnataka) मैसूर शहरात एका हॉटेलमध्ये प्रियांका गांधी डोसा तयार केला आहे. त्यामुळे त्यांचा व्हिडीओे सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. कर्नाटक राज्यात निवडणुका (Karnataka election 2023) होणार आहेत. निवडणुक असल्यामुळे प्रचार करण्यासाठी प्रियांका गांधी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्या हॉटेलमध्ये गेल्या, त्यावेळी त्यांनी स्वतः डोसा तयार केला आहे. त्यावेळी प्रियांका गांधी यांच्यासोबत डीके शिवकुमार आणि रणदीप सिंह सुरजेवाला या देखील नेत्यांची उपस्थिती होती.
प्रियांका गांधी डोसा तयार करीत होत्या. त्यावेळी त्या हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये प्रियांका गांधी तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत गप्पा मारीत आहेत. प्रियांका गांधी यांनी डोसा तयार केल्याचं व्हिडीओ स्पष्ट दिसत आहे.
कर्नाटकमधील Mylari Hotel असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. मैसूर परिसरातील सगळ्यातं जुनं हे हॉटेल आहे. त्यानंतर प्रियांका गांधी तिथल्या हॉटेलच्या मालकांना आणि कुटुंबियांना शुभेच्छा देऊन, सेल्फी घेतली. माझ्या मुलीला डोसा ट्राय करण्यासाठी मैसूरला लवकरचं घेऊन येईन.
Perfect dosas are just the beginning; with such skillful hands, there’s no limit to the power they can bring to the world. pic.twitter.com/qsgUw6IBeJ
— Congress (@INCIndia) April 26, 2023
काल मैसूरमध्ये प्रचारसभेत प्रियांका गांधी म्हणाल्या की, ‘पंतप्रधान इथे आले आणि म्हणाले की विरोधी पक्षाच्या नेत्याला त्यांची कबर खणायची आहे. हे कसे आहे? पंतप्रधानांची प्रकृती उत्तम राहावी अशी देशातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.
Enjoyed making dosas with the legendary Myalri Hotel owners this morning….what a shining example of honest, hard work and enterprise.
Thank you for your gracious hospitality. The dosas were delicious too…can’t wait to bring my daughter to Mysuru to try them. pic.twitter.com/S260BMEHY7
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 26, 2023
कर्नाटकची जनता कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरुन मतदान करणार नाही, तर त्यांनी आपल्या आंतरआत्माच्या आवाजावर मतदान करायला हवं.
कर्नाटक राज्यात सध्या बदलाचं वातावरणं आहे, भाजपने अद्याप कुठल्याही प्रकारचं योग्य काम केलेलं नाही असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला.