Pune News : पुणे शहरात 80 वर्षीय आजी सायकलवर सुसाट, व्हिडिओ व्हायलर

Pune News : पुणे तेथे काय उणे असे नेहमीच म्हटले जाते. कारण पुणेकरांचे प्रत्येक गोष्टीत असणारे वेगळेपण. जगाच्या पाठीवर सर्वत्र पुणेकरांचे हे वेगळेपण दिसून येते. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ८० वर्षांच्या तरुण आजीबाईंचा हा व्हिडिओ आहे.

Pune News : पुणे शहरात 80 वर्षीय आजी सायकलवर सुसाट, व्हिडिओ व्हायलर
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 11:48 AM

पुणे | 14 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात प्रचंड वाहतूक आहे. देशात सर्वाधिक वाहनांची संख्या पुणे शहरात आहे. यामुळे प्रदूषणाची पातळी पुण्यात वाढली आहे. आता जवळपास प्रत्येक पुणेकरांकडे दोन गाड्या आहेत. परंतु सायकल मात्र नाही. आता अनेक घरांत फक्त मुलांसाठीच सायकली आहेत. त्यामुळेच सायकलने प्रवास करणारा पुणेकर मिळणे अवघडच झाले आहे. पुणे शहरात सायकलस्वारांसाठी काही रस्त्यांवर सायकल ट्रॅक तयार केला गेला. परंतु या ट्रॅकवर सायकली दिसत नाही. त्यामुळे गाड्यांची पार्किंग या ठिकाणी असते. या सर्व प्रकारात पुणे शहरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कोणाचा आहे व्हिडिओ

पुणे शहरातील ८० वर्षीय तरुण असलेल्या आजीबाईचा हा व्हिडिओ आहे. ज्या रस्त्यांवर चालणे अवघड असते त्या रस्त्यांवर या आजीबाई साडी परिधान करुन सायकलने प्रवास करत आहे. व्हिडिओ शुट करणारे आजीबाईंना तुम्ही किती वर्षांच्या तरुणी आहेत? कुठे जाणार आहेत? असे प्रश्न विचारताना दिसत आहे. या वयात आजीबाई सायकल चालवत असल्याबद्दल रस्त्यावरील अनेकांना आश्चर्य वाटत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

कधी काळी सायकल प्रवासासाठी महत्वाची

पुणे शहरात सुमारे तीस वर्षांपूर्वी सायकल प्रवासासाठी महत्वाचे वाहन होते. अनेक जण आठ, दहा किलोमीटरपर्यंतचा प्रवास सायकलने करत होते. परंतु त्यानंतर वाहनांची संख्या वाढत गेली. प्रत्येक घरात असणाऱ्या सायकलची जागा दुचाकीने घेतली. यामुळे शहरातील प्रदूषणही वाढले. आता किशोरवयीन मुले नियम तोडून सायकल ऐवजी दुचाकी वाहन चालवताना दिसतात. त्यावेळी ८० वर्षीय तरुण आजीबाईंचा सायकल प्रवास निश्चित कौतूकास्पद आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.