Optical Illusion | या चित्रात कोळी शोधून दाखवा!
अनेकदा एखाद्या फोटोत अनेक वस्तू दिसून येतात, तर कधी काही गोष्टी अशा प्रकारे बनवल्या जातात की त्या दिसत नाहीत. या एपिसोडमध्ये ऑप्टिकल इल्युजनचे आणखी एक चित्र समोर आले आहे, ज्यात काही चप्पल दिसतायत. या चप्पलांच्या मध्ये तुम्हाला कोळी शोधायचा आहे.
मुंबई: आपल्या डोळ्यात संभ्रम निर्माण करण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजन फोटो बनवले जातात. अनेकदा एखाद्या फोटोत अनेक वस्तू दिसून येतात, तर कधी काही गोष्टी अशा प्रकारे बनवल्या जातात की त्या दिसत नाहीत. या एपिसोडमध्ये ऑप्टिकल इल्युजनचे आणखी एक चित्र समोर आले आहे, ज्यात काही चप्पल दिसतायत. या चप्पलांच्या मध्ये तुम्हाला कोळी शोधायचा आहे.
नुकताच हा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. या फोटोत चप्पलांची रांग लागल्याचे दिसत आहे. चप्पल पाहून असं वाटतं की हे चप्पलचं दुकान आहे, जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल ठेवल्या जातात. सर्व चप्पल त्यांच्या जोड्यांसोबत ठेवल्या जातात. या चप्पलांच्या मध्ये एक कोळी बसलेला आहे.
बराच शोध घेऊनही लोकांना हा कोळी सापडत नाही. जर तुम्हाला हा कोळी सापडला तर तुमच्या डोळ्यांची खरी परीक्षा होईल. इतकंच नाही तर तुम्हाला जीनियसही म्हटलं जाईल. मीडिया रिपोर्टनुसार, चप्पलमधील कोळी अद्याप कोणालाही सापडलेला नाही. एकदा तुम्हीही पाहू शकता.
खरं तर त्यात कोळी शोधण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल. नीट पाहिलं तर एक मोठा कोळी बसलेला दिसतो. चित्राच्या डाव्या बाजूला खाली पडलेल्या पहिल्या पिशवीच्या वर हा कोळी बसलेला आहे. पिशवीचा आणि कोळीचा रंग एकच असल्याने तो लगेच दिसत नाही. पण नीट पाहिलं तर कोळी दिसेल. खाली आम्ही उत्तर दाखवत आहोत.