Video: पिलांच्या रक्षणासाठी आई काय करते पाहा, मादा अजगराचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

एक व्यक्ती त्या मादी अजगराच्या अंड्यांना स्पर्श करण्याचा किंवा घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण अजगराची मादी त्याला अंड्याजवळ येऊही देत नाही आणि त्याला चावण्यास सुरुवात करते.

Video: पिलांच्या रक्षणासाठी आई काय करते पाहा, मादा अजगराचा व्हिडीओ तुफान व्हायरल!
आपल्या अंड्याचं रक्षण करणारी अजगराची मादी
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 2:29 PM

आई ही नेहमीच आई असते, मग तो माणूस असो वा प्राणी. आई मुलांना चालायला, धावायला, खायला शिकवते शिवाय, त्याच वेळी ती त्यांचे सर्व प्रकारे संरक्षण करते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये आईची ममता आणि तिची ओढ दिसून येते. असाच एक अप्रतिम व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही नक्कीच म्हणाल की, आई अशीच असते. हा व्हिडिओ एका महाकाय मादी अजगराचा आहे, जी आपल्या अंड्यांचे रक्षण करण्यासाठी काहीही करण्यास तयार असते. (python Attack Video Man wanted to touch the python eggs then snake attack video viral)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मादी अजगर एका छोट्या बॉक्समध्ये भरपूर अंडी घालून बसलेली आहे. ही अंडी त्याच अजगराची आहेत, ज्यामध्ये त्याची पिल्ले वाढत आहेत. आता तुम्हाला हे माहित असेलच की, काही सापांच्या प्रजाती सोडल्या तर बहुतेक साप थेट पिल्लं जन्माला घालत नाहीत, आधी अंडी घालतात, जी काही दिवसांनी उबवतात आणि त्यातून पिल्लं बाहेर येतात. त्यामुळे ही मादी अजगर आपल्या पिल्लांचे म्हणजेच अंड्यांचे रक्षण करत आहे.

यादरम्यान एक व्यक्ती त्या मादी अजगराच्या अंड्यांना स्पर्श करण्याचा किंवा घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण अजगराची मादी त्याला अंड्याजवळ येऊही देत नाही आणि त्याला चावण्यास सुरुवात करते. माणूस उजवीकडे आणि डावीकडे सर्व बाजूंनी प्रयत्न करून थकला, परंतु मादी अजगराने तिच्या अंड्यांना हात लावू दिला नाही. हा व्हिडीओ एका आईच्या अप्रतिम प्रेमाची प्रचिती देतो.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर jayprehistoricpets नावाने शेअर करण्यात आला आहे आणि ‘आई तिच्या पिलांच्या संरक्षणासाठी कुठल्याही थराला जाते’ असे कॅप्शन लिहिले आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आतापर्यंत याला 7 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत, तर 54 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. या मातेच्या प्रेमाला लोक नमस्कार करताना थकत नाहीत. तुम्ही पण हा व्हिडिओ एकदा जरूर पहा.

हेही पाहा:

Video: 15 व्या वाढदिवसाला मुलीची महिंद्राच्या ट्रॅक्टरवर एन्ट्री, परदेशी मुलीचा व्हिडीओ आनंद महिंद्राकडून ट्विट

Video: भाजपचे ‘MP गजब है!’, मोदींनी दाढी झटकली तर 50 लाख घरं पडतात, भाजप खासदाराचं वक्तव्य

 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.