दारूच्या नशेत पराक्रम! अजगर उचलला, गळ्याभोवती गुंडाळला! मग काय यमराज आठवला, गाव जमा झालं, बघा व्हिडीओ
त्याने अजगराला पकडून त्यांच्या गळ्यात गुंडाळलं. पण अजगराने मान पकडायला सुरुवात केली तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी ओरडू लागला.
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. गढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिहारा पंचायतीच्या कितासोटी खुर्द गावात ही घटना घडलीये. दारूच्या नशेत 55 वर्षीय बिरजलाल राम भुयान हे धरणातून बाहेर पडणाऱ्या कालव्याच्या उथळ पाण्यात मासेमारी करण्यासाठी गेले होते. पण जेव्हा त्याची नजर अजगरावर पडली, तेव्हा त्याने अजगराला पकडून त्यांच्या गळ्यात गुंडाळलं. पण अजगराने मान पकडायला सुरुवात केली तेव्हा बिरजलाल आपला जीव वाचवण्यासाठी ओरडू लागला. माहिती मिळताच त्या व्यक्तीचा मुलगा घटनास्थळी पोहोचला आणि जवळपास 15-20 मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर मित्रांच्या मदतीने अजगराला हटवून त्याने पित्याचे प्राण वाचवले. या व्यक्तीलाही किरकोळ दुखापत झाली.
45 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुण त्या व्यक्तीच्या गळ्यातील अजगर काढण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. तो अजगराला पकडून ओढतोय.
पण हा महाकाय साप केवळ त्या माणसाला काय सोडायला तयार नसतो, तर तो अधिक ताकदीने मान पकडत राहतो. मग दुसरा माणूस येतो आणि मदत करू लागतो, पण दोघांच्या सर्व प्रयत्नांनंतरही अजगर त्या माणसाच्या गळ्यात गुंडाळला जातो. हा अजगर काढण्यासाठी काही लोक तरुणाला विविध प्रकारचे सल्ले देत आहेत.
गढ़वा : नशे की हालत में परिहारा पंचायत के कीतासोती खुर्द गांव में शराब के नशे में बिरजालाल राम भुइयां ने अजगर को पकड़ कर अपने शरीर में लपेट लिया। अजगर ने उसकी गर्दन को जकड़ने लगा, तो जान बचाने की गुहार लगाने लगा। जानकारी मिलने पर बेटा ने अपने दोस्तों की मदद से पिता की जान बचायी। pic.twitter.com/AAP0DCP4GL
— Sp Mehta Raju (@SpMehtaRaju3) November 11, 2022
ही क्लिप 11 नोव्हेंबर रोजी ट्विटर हँडल @SpMehtaRaju3 शेअर केली होती. त्यांनी कॅप्शन दिलं की, “गढवा : दारूच्या नशेत बिरजलाल राम भुयान यांनी मद्यधुंद अवस्थेत परिहारा पंचायतीच्या कितासोती खुर्द गावात अजगराला पकडून आपल्या गळ्याभोवती गुंडाळलं. अजगराने आपली मान पकडायला सुरुवात केल्यावर त्याने आपला जीव वाचवण्याची विनवणी केली. ही माहिती मिळताच मुलाने मित्रांच्या मदतीने वडिलांचे प्राण वाचवले.” आता ही धक्कादायक क्लिप सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन शेअर केली जात आहे.