वल्हव रे नाखवा…केरळात राहुल गांधींचा नवा अंदाज, स्नेक बोटीवर चप्पू हातात घेत स्वारी!
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी काही ना काही कारणाने सतत चर्चेत राहत आहेत. आधी त्यांच्या हजारो रुपये किंमतीचा पांढरा टी शर्टवरुन वाद उद्धभवला. नंतर प्रत्येकाला भेटतानाचे त्यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्यासाठी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) काढली आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात ते केरळात (Kerala) आहे. तिथं ते लोकांना जावून भेटत आहे, ज्याचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात राहुल गांधींनी चक्क स्नेक बोट (Snake Boat) चालवली आहे.
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी काही ना काही कारणाने सतत चर्चेत राहत आहेत. आधी त्यांच्या हजारो रुपये किंमतीचा पांढरा टी शर्टवरुन वाद उद्धभवला. नंतर प्रत्येकाला भेटतानाचे त्यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले. एका मुलीसोबतचा त्यांचा एक अप्रतीम फोटोही व्हायरल झाला. अगदी घराघरापर्यंत जाऊन ते लोकांना भेटत आहे, ज्यावर कधी टीका होते, तर कधी कौतूक.
अशाच एका इव्हेंटमध्ये राहुल गांधीनी भाग घेतला. हा इव्हेट होता स्नेक बोट चालवण्याचा. केरळच्या पुननमदा तलावात राहुल गांधी आपल्या स्नेक बोटसह उतरले, त्यांच्या हाती चप्पू होता, आणि अगदी सहजपणे ते ही बोट हाकत होते. स्नेक बोटची शर्यत हा केरळमधला पारंपरिक खेळ आहे, ज्याला इथं खूप मानाचं स्थान आहे.
India will ride the rough sea of hatred, unemployment and price rise. We stay united, we stay anchored. #BharatJodoYatra pic.twitter.com/WwZTXFQ1tV
— Congress (@INCIndia) September 19, 2022
स्नेक बोट चालवून राहुल गांधी केरळच्या संस्कृतीशी आपल्याला जोडू पाहत आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी केरळच्या पुननमदा तलावात साप बोट शर्यतीच्या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.यावेळी अशा 3 स्नेक बोटींमध्ये शर्यत लावण्यात आली होती. एका बोटीवर किमान 100 लोक दोन्ही बाजूने बसलेले असतील. प्रत्येकाच्या हाती चप्पू होता.
पाहा व्हिडीओ:
लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।#BharatJodoYatra pic.twitter.com/GN4QXLFgwR
— Congress (@INCIndia) September 19, 2022
राहुल गांधी या बोटीच्या मधोमध बसलेले होतो. अंगात तोच पांढरा टी शर्ट आणि साधी पॅट. एक पाय बोटीच्या किनाऱ्यावर तर एक बोटीत आणि हाती चप्पू. अगदी सर्वांसोबत एका लईत राहुल गांधी यांनी बोट चालवली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा तोच तलावर आहे, जिथं दरवर्षी बोटींच्या स्पर्धा होत असतात. आणि यावर मोठी बक्षीसही असतात. केरळचा हा पारंपरिक खेळ अनुभवण्याची संधी राहुल गांधींना मिळाली.