राणू मंडल यांनी सुरात गाण्याचा प्रयत्न केला Kacha Badam; पण यूझर्स उडवतायत खिल्ली, पाहा Video
एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक बंगाली (Bengali) माणूस स्वतःच्या स्टाइलमध्ये गाणं गात शेंगदाणे विकत आहे. राणू मंडल (Ranu Mondal) यांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गाण्यानंच त्यांना ओळख दिली. आता त्यांचा एक व्हिडिओदेखील सध्या खूप व्हायरल होतोय. यामध्ये त्या त्यांच्या खास स्टाइलमध्ये Kacha Badam गाणं गाताना दिसत आहेत.
Ranu Mondal Kacha Badam : सोशल मीडिया एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की त्यातल्या व्यक्तीही व्हायरल होत असतात. त्या एवढ्या व्हायरल होतात, की लोक रातोरात स्टार बनतात. एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक बंगाली (Bengali) माणूस स्वतःच्या स्टाइलमध्ये कच्चा बदाम गाणं गात वस्तू विकत आहे. आता हे गाणं सोशल मीडियावर इतकं आवडलं गेलं आणि प्रसिद्ध झालं, की लोक या गाण्यावर नाचतानाही दिसत आहेत, तर काही लोक हे गाणं गात स्वतःला प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. राणू मंडल (Ranu Mondal) यांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गाण्यानंच त्यांना ओळख दिली. आता त्यांचा एक व्हिडिओदेखील सध्या खूप व्हायरल होतोय. यामध्ये त्या त्यांच्या खास स्टाइलमध्ये Kacha Badam गाणं गाताना दिसत आहेत.
लोकांना नाही आवडलं
राणू मंडल यांनी हे गाणं सुरात आणि लयीत गाण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यांचा व्हिडिओ लोकांना अजिबात आवडलेला दिसत नाही. लोकांनी त्यांच्या गाण्याची खिल्ली उडवली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर shiney_girl78 नावानं शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोकांनी विविध मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका यूझरनं ‘बंद करो’ असं लिहिलं आहे, तर दुसऱ्या यूझरनं ‘तौबा तौबा… सारा मूड खराब कर दी’ अशी कमेंट केली आहे. त्याचप्रमाणं आणखी एका यूझरनं मजेशीरपणे लिहिलं आहे, की ‘ओ भाई मारो मुझे मारो…ये मजाक हो रहा है यहां’.
View this post on Instagram
रातोरात झाल्या होत्या स्टार
लता मंगेशकर यांचं गाणं गात राणू मंडल रातोरात स्टार बनल्या. त्या पूर्वी फूटपाथवर गायच्या, पण 2019मध्ये त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्या ‘एक प्यार का नगमा है’ गाताना दिसल्या होत्या. त्यांचं हे गाणं सोशल मीडियावर इतके व्हायरल झालं, की बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, गायक आणि अभिनेता हिमेश रेशमिया यांनी त्यांना बॉलिवूडमध्ये एन्ट्रीही दिली.