Ranveer Singhनं शेअर केला ‘Chhoti Deepika’चा Video, हावभाव पाहुन तुम्हीही कराल कौतुक

Ranveer Singh shares chhoti Deepika's video : दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक. एक मुलगी दीपिकाच्या 'राम लीला' (Ram Leela) चित्रपटाच्या डायलॉगवर जबरदस्त एक्सप्रेशन देत लिप सिंक (Lip sync) दिसत आहे.

Ranveer Singhनं शेअर केला 'Chhoti Deepika'चा Video, हावभाव पाहुन तुम्हीही कराल कौतुक
दीपिका पदुकोणच्या सिनेमातल्या डायलॉग्सवर लिप सिंक करताना चिमुरडी 'छोटी दीपिका'
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 12:30 PM

Ranveer Singh shares chhoti Deepika’s video : दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली आणि तेव्हापासून तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या काळात त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण त्याचा परिणाम त्यांनी करिअरवर होऊ दिला नाही. विशेष म्हणजे तिचे काही डायलॉग्स इतके हिट आहेत की सर्व वयोगटातील लोक त्यावर लिप-सिंक करून सोशल मीडिया यूझर्सची मने जिंकण्याचा प्रयत्न करतात. सध्या एका ‘छोटी दीपिका’च्या व्हिडिओने सोशल मीडियाच्या विश्वात धुमाकूळ घातला आहे. मुलगी ‘राम लीला’ (Ram Leela) चित्रपटाच्या डायलॉगवर जबरदस्त एक्सप्रेशन देत लिप सिंक (Lip sync) दिसत आहे. हा व्हिडिओ स्वतः रणवीर सिंगने शेअर केला आहे. तसेच तिचे खूप कौतुकही केले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी सोफ्यावर बसलेली दिसत आहे. तिने दीपिका पदुकोणसारखे कपडे घातले आहेत. याशिवाय मेकअपही जुळवण्याचा प्रयत्न केला आहे.

‘रामलीला’वर लिप सिंक

रामलीला चित्रपटातील डायलॉग्सवर ही मुलगी लिप सिंक करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ केवळ 20 सेकंदांचा आहे, परंतु सोशल मीडिया यूझर्सना तो पुन्हा पुन्हा पाहणे आवडत आहे. कारण त्या मुलीने इतके दमदार एक्स्प्रेशन्स दिले आहेत, की तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल.

रणवीर सिंगने शेअर केला व्हिडिओ

रणवीर सिंगने त्याच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. पत्नी दीपिका पदुकोणला टॅग करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘लीला जैसी कोई नहीं! अपने इस मिनी वर्जन को चेकआउट करो. मैं तो इस छोटी दीपिका के एक्सप्रेशन्स का दीवाना हो गया हूं.’ सोशल मीडियावर लोक या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. मुलीचा गोंडसपणा सर्वांनाच भावतोय.

यूझर्सना आवडला व्हिडिओ

ट्विटरवर एक दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी, 4500हून अधिक लोकांनी याला लाइक केले आहे आणि 500​​हून अधिक लोकांनी ते रिट्विट केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याच वेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर, यूझर्स त्यावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

आणखी वाचा :

पेरू खाण्याचं ‘हे’ अजब चॅलेंज स्वीकारणार का? पाहा ‘हा’ Viral झालेला Funny Video

Viral : कोट्यवधी रुपयांच्या बुगाडीवर अब्जावधीची सर्जनशीलता भारी! अफलातून Creativityचा ‘हा’ Video पाहाच

Emotional Video Viral : जगात आईपेक्षा कुणीही मोठं नाही म्हणत मुलाचा प्राणत्याग!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.