Ratan Tata : टाटांच्या वाढदिनी केक, टाळ्याही वाजवल्या, पाठही थोपटली, पण हे सगळं करणारा तो तरुण कोण?

दानशूर हीच ओळख असणारे भारताचे 'रतन' टाटा यांना नुकतंच वयाच्या 84 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.या वाढदिवसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पण या व्हिडीओ मधील तरुण युवकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. जाणून घ्या कोण आहे हा तरुण.

Ratan Tata : टाटांच्या वाढदिनी केक, टाळ्याही वाजवल्या, पाठही थोपटली, पण हे सगळं करणारा तो तरुण कोण?
ratan tata
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 10:45 AM

मुंबई : दानशूर हीच ओळख असणारे भारताचे ‘रतन’ टाटा यांना नुकतंच वयाच्या 84 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. अत्यंत साधेपणाने त्यांनी वाढदिवस साजरा केला. त्यांनी छोट्या कप केकवर लावलेल्या मेणबत्तीला फुंकर मारून आपला वाढदिवस आनंदात साजरा केला. या वाढदिवसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  साधेपणाने साजरा केलेल्या वाढदिवसावर नेटकऱ्यांनी  प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण या व्हिडीओ मधील तरुण युवकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

व्हिडीओमध्ये नक्की आहे तरी काय

उद्योपती रतन टाटा यांनी नुकताच त्यांचा 84 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचा व्हिडीओ टाटा मोटर्स फायनान्सचे व्यवसाय व्यवस्थापक वैभव भोईर यांनी सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये रतन टाटा निळ्या रंगाच्या शर्टमध्ये स्मितहास्य देताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सोबत 28 वर्षांचा एक तडफदार तरुण पाहायला मिळत आहे. हा तरुण म्हणजे उद्योगपती शंतनू नायडू. नायडूंनी टाटांसाठी टाळ्या वाजवल्या आणि त्यांच्या बॉससाठी वाढदिवसाचे गाणे गायले, त्यांच्या खांद्यावर थोपटलेसुद्धा. आपल्या युनिक आयडियांसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या ते टाटाच्या कार्यालयात उपमहाव्यवस्थापक म्हणून काम करतात.

कोण आहेत उद्योगपती शंतनू नायडू (who is shantanu naidu)

28 वर्षीय शंतनू नायडू यांची मोटोपॉज नावाची कंपनी असून ही कंपनी डॉग कॉलर बनवते. अनेकदा कुत्रे वाहनाखाली येऊन मरतात ही गोष्ट शंतनू नायडू यांच्या लक्षात आली यानंतर शंतनूला रिफ्लेक्टर कॉलर बनवण्याची कल्पना सुचली.या कॉलरच्या साहाय्याने रस्त्यावरील दिवे नसतानाही वाहनचालक कुत्रे दुरून पाहू शकतात. शंतनूने वडिलांच्या सांगण्यावरून रतन टाटा यांना पत्र लिहिले आणि या कल्पने बद्दल सांगितले आणि त्याला उत्तर म्हणून रतन टाटा यांना भेटण्याचे आमंत्रण मिळाले.  टाटांच्या प्राणी प्रेमाबद्द्ल आपल्या सर्वांनाच माहित आहे. ही गोष्ट जेव्हा रतन टाटांना कळाली तेव्हा त्यांनी शंतनू नायडूचे कौतुक केले. सध्या रतन टाटा ज्या स्टार्टअप्समध्ये त्यांची वैयक्तिक गुंतवणूक करतात त्या स्टार्टअप्समागे 28 वर्षीय शंतनू नायडू यांचा विचार असतो.

संबंधित बातम्या : 

VIDEO : कुत्रा आणि मालकाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा काय आहे या व्हिडीओमध्ये!

Viral Video : अय्यो…! वरमाला घालण्यापूर्वी वरानं घातली ‘अशी’ अट, की वधूही लाजली!

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.