बापरे! चक्क एका ‘रोबोट’चा विश्वविक्रम! हा रोबोट माणसापेक्षा वाढीव आहे बघा…
ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि स्पिनऑफ कंपनी एजिलिटी रोबोटिक्सने या रोबोटची निर्मिती केलीये.
रोबोट्समुळे माणसांसाठी गोष्टी सोप्या होतील हे निश्चित होतं, पण रोबोट्सही खेळाच्या मैदानावर स्पर्धा करतील असा अंदाज फार कमी लोकांना आला असेल. होय, अमेरिकेतून अशीच एक घटना समोर आलीये, जिथेएका स्पर्धेत रोबोटला उतरविण्यात आलं होतं. यानंतर जे घडलं ते आश्चर्यकारक होतं. या रोबोटने शर्यतीत विश्वविक्रमही केला आणि या विक्रमाचा समावेश गिनीज बुकमध्ये करण्यात आला.
या रोबोटचं नाव कॅसी असं आहे. ही घटना अमेरिकेतील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि स्पिनऑफ कंपनी एजिलिटी रोबोटिक्सने या रोबोटची निर्मिती केलीये.
याला कॅसी रोबोटो असे नाव देण्यात आले आहे. हा रोबो 100 मीटर शर्यतीसाठी मैदानात उतरला होता. दोन पायांचा हा रोबोट ट्रॅकवर 24.7 सेकंदात 100 मीटर धावला आणि त्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव समाविष्ट केलं.
धावपट्टीवर धावणाऱ्या या रोबोटचा व्हिडिओही व्हायरल झालाय. जोनाथन हर्स्ट, ओरेगॉन स्टेट रोबोटिक्सचे प्राध्यापक आणि एजिलिटी रोबोटिक्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली याची निर्मिती करण्यात आलीये.
Robot World Record: Not sure whether to be inspired or terrified? https://t.co/xevauknkpV pic.twitter.com/2SlycGFsaX
— Dan Tilkin (@DanTilkinKOIN6) September 27, 2022
यापूर्वी या रोबोटने कॉलेज कॅम्पसमध्ये 53 मिनिटांच्या वेळेसह संपूर्ण 5 हजार मीटरची शर्यत पूर्ण केली होती. यानंतर रोबोटिक्स विश्वात विक्रम करणारा हा नवा विक्रम केला आहे.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शेअर करत अमेरिकन पत्रकार डॅन टिल्किन यांनी लिहिले की, हा रोबोटचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मला माहित नाही की आपण हे बघून प्रेरित व्हायला हवं की घाबरायला हवं. सध्या जगभरातील लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत.