VIDEO | चालत्या स्कूटीवर रोमान्स, बसण्याची स्टाईल बघून लोकांनी डोक्यावर…
VIRAL VIDEO | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये चालत्या स्कुटीवर रोमांस करीत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Scooty Wala Romance Video) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक कपल स्कुटीवर रोमांस करीत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांनी त्या व्हिडीओला चांगल्या वाईट कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना लाज सुध्दा वाटली आहे. सध्याचा सोशल मीडियावर (social media) व्हायरल झालेला व्हिडीओ लोकांना अधिक खटकला असल्याचं दिसत आहे. दोन्ही कपल अशा पद्धतीने बसलं आहे की, जसं काही सिनेमा हॉलच्या सीटवर बसले आहेत. अनेकांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी चांगल्या आणि वाईट कमेंट (comment) केल्या आहेत.
हा व्हि़डीओ दिल्लीचा असल्याचं एका वेबसाईटनं सांगितलं आहे. पांढऱ्या रंगाच्या स्कूटीवर बसलेले एक जोडपे स्वतःमध्ये कसे हरवलेले पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये स्कूटी चालवणारा व्यक्ती मागे बसलेल्या मुलीच्या गळ्यात हात घालत आहे. लोकं सुध्दा या व्हिडीओला पाहून विचार करीत आहेत. काही लोकं म्हणत आहेत की, हा सिनेमा हॉल आहे की गाडी ? हा सगळा प्रकार एका कारवाल्या व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ कोणत्या क्षेत्रातला आहे. हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
View this post on Instagram
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @shalukashyap28 नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ लोकांनी अधिक पाहिला आहे आणि त्याचबरोबर शेअर सुध्दा केला आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने एक कॅप्शन लिहीलं आहे. ‘दिल्लीच्या रस्त्यावर इस्क आणि रिस्क.’हा व्हिडीओ १४ मे ला शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ ४३ लाख लोकांनी पाहिला आहे. 2 लाख 23 हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. त्या व्हिडीओला वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘हे कसलं प्रेम होतंय दिल्लीवाल्यांना.’ दुसर्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘यमराज जी आणि दिल्ली पोलीस रजेवर असतात तेव्हा हे प्रेम परत मिळते.’ एका जागृत नेटकऱ्यांनी लिहीले की, ‘आमचा समाज दोन लोकांचे सुख पाहू शकत नाही, का?’ एक नेटकरी म्हणतो ‘भाऊ, स्कूटी चालवा. जर तो पडला तर त्याचे डोके फुटेल.