गरीब मुस्लिम बांधवासोबत जे झालं, ते पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! धारवाडमधील संतापजनक घटना
मुंबईः सध्या सोशल मीडियावर (S0icial Media) एक पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गरीब आणि सामान्य कलिंगड (watermelon) फेरीविक्रेता आपला तो छोटो मोठा व्यवसाय कसाबसा करतो आहे. त्या सामान्य गरीब कलिंगड विक्रेत्याच्या हातगाडीवरील कलिंगड श्रीराम सेनेच्या (Bajran Dal) कार्यकर्त्यांनी रस्त्यावरुन आपटून फोडली आहेत, त्या फोडलेल्या कलिंगडांचा खच रस्त्यावर दिसत आहे. हे दृश्य बघून कोणताही माणूस […]
मुंबईः सध्या सोशल मीडियावर (S0icial Media) एक पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गरीब आणि सामान्य कलिंगड (watermelon) फेरीविक्रेता आपला तो छोटो मोठा व्यवसाय कसाबसा करतो आहे. त्या सामान्य गरीब कलिंगड विक्रेत्याच्या हातगाडीवरील कलिंगड श्रीराम सेनेच्या (Bajran Dal) कार्यकर्त्यांनी रस्त्यावरुन आपटून फोडली आहेत, त्या फोडलेल्या कलिंगडांचा खच रस्त्यावर दिसत आहे. हे दृश्य बघून कोणताही माणूस हळहळल्याशिवाय राहणार नाही, इतकं वाईट त्या गरीब कलिंगड फेरीविक्रेत्याची अवस्था बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबतची पोस्ट राज अस्नोडकर यांनी केली असून त्या पोस्टमध्ये त्यांनी सविस्तर लिहिले आहे.
राज अस्नोडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांप्रमाणे तुम्हाला जमते का बघा असं उपरोधान म्हटलं आहे. या घटनेची पोस्ट करण्यात आल्यानंतर अनेकांनी त्या पोस्टला कमेंट आणि शेअर केली आहे. फेसबुकवरील पोस्टमध्ये कलिंगड विक्रेत्याला मारहाण झाल्याचे दिसत नाही पण या पोस्टमध्ये मारहाणीचा उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे हे जमते का बघा असंही आवाहन केले गेले आहे. ज्या व्यावसायिकाच्या हातगाडीवरील कलिंगडांचे नुकसान केले गेले आहे, तो मुस्लिम असल्याचा उल्लेखही केला गेला आहे. श्रीराम सेनेचे कार्यकर्ते गळ्यात बजरंग दलाची पट्टी घालून ते कलिंगड फोडत असल्याचे दिसत आहे. कलिंगड फोडणाऱ्यांच्या कृत्याला पराक्रम आणि शौर्यही असंही संबोधन्यात आले आहे. या घटनेविषयी तुमची आई विचारेल तेव्हा इतिहासातील संदर्भ देत आईचं मुंडकं उडवायला सांगितलेल्या कथेचीही राज अस्नोडकर यांनी आठवण करुन दिली आहे.
Cops present at the location did nothing to stop the vandalism of poor Muslim push cart vendors by Right Wing goons of Sri Ram Sena outside Hanuman Temple in Dharwad. Why is @BSBommai @DgpKarnataka allowing this to happen in Karnataka. pic.twitter.com/FxXR55cGWV
— Mohammed Zubair (@zoo_bear) April 9, 2022
पोलीस बघ्याच्या भूमिकेत
धारवाडमधील हनुमान मंदिराबाहेर घडलेल्या या घटनेचा हा व्हिडीओ ट्विविटरवरसुद्धा शेअर केला गेला आहे. त्यामध्ये श्रीराम सेनेच्या गुंडाकडून गरीब मुस्लिम फळविक्रेत्याच्या हातगाडीची तोडफोड होत असूनही त्या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांनीही कोणताही हस्तक्षेप केला नाही म्हणून मोहम्मद जुबेर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. बोम्मई यांना टॅग करुन उपस्थित असलेल्या पोलिसांनी कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित केला गेला आहे.
दबाव गट निर्माण
धारवाडमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. घडलेल्या या प्रकारामुळे एका विशिष्ट विचारसरणीचा कसा दबाव गट तयार होत असून ते चुकीचे असल्याचे मत मांडण्यात आले आहे. कलिंगड फोडून टाकण्यात आल्यानंतर कलिंगड विक्रेता आपली हातगाडी घेऊन जाताना दिसत आहे.
इतकं करुन बघा असा सल्ला
धारवाडमधील हातगाडी चालवणाऱ्या कलिंगड विक्रेत्याची ही अवस्था करणाऱ्या पाहून कोणत्याही माणसाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे राज अस्नोडकर यांनी शेवटी हे कृत्य करणाऱ्याना इतकं करुन बघा असा सल्ला दिला आहे. अस्नोडकरांच्या या पोस्टमध्ये इतिहास आणि वर्तमान काळातील घटना सांगून हा व्हिडीओ सगळीकडे पसरवा असेही सांगण्यात आलेआहे.
संबंधित बातम्या
टाटा कारवर मिळवा बंपर ऑफर, एक्सचेंजसह साडेआठ लाखांपर्यंतचा भरघोस फायदा…