शर्टलेस झालेल्या ‘सलमान’ला जामीन; पोलिसांच्या कारवाईचं कौतुक, भाईला आता भाईजानला भेटायचंय!

आझम (Azam Ansari) हा रिअल इस्टेटमध्ये काम करत असून इन्स्टाग्रामवर त्याचे एक लाख फॉलोअर्स आहेत. सलमानच्या विविध गाण्यांवर त्याने व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

शर्टलेस झालेल्या 'सलमान'ला जामीन; पोलिसांच्या कारवाईचं कौतुक, भाईला आता भाईजानला भेटायचंय!
Azam AnsariImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 11:54 AM

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) स्टाइलची कॉपी करत भररस्त्यात गोंधळ घातलेल्या आझम अन्सारी (Azam Ansari) या तरुणाला लखनऊमधील ठाकूरगंज पोलिसांनी रविवारी संध्याकाळी अटक केली होती. सलमानच्या या चाहत्याला सोमवारी स्थानिक कोर्टाने जामीन मंजूर केला. पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्यच होती, असं तो सुटका होताच म्हणाला. आझम हा सलमानचा खूप मोठा चाहता आहे. शर्ट उतरवण्याची सलमानची स्टाइल त्याचे लाखो चाहते कॉपी करतात. आझमनेही तेच केलं, मात्र भररस्त्यात. रस्त्यावरील या गोंधळामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. आझमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

जामिनावर सुटका झाल्यानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना तो म्हणाला, “अटक झाल्याचं मला काहीच दु:ख नाही. पोलिसांनी योग्य ती कारवाई केली. कोणत्याच पोलीस अधिकाऱ्याने माझ्याशी गैरवर्तणूक केली नाही आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा योग्य वागणूक देत होते. सलमान खानचा मी खूप मोठा चाहता आहे. सलमान नेहमीच गरीबांची आणि गरजूंची मदत करतो. तो स्वत:लाही फिट ठेवतो. 15 वर्षांपूर्वी माझं वजन खूप वाढलं होतं. 128 किलो माझं वजन होतं. सलमानचा चाहता असल्याने मी त्याचे सर्व चित्रपट पहायचो. त्याच्यासारखा फिट होऊन दाखवेन असा निश्चय मी केला आणि जिमला जाऊ लागलो. सलमानमुळेच मी आता फिट आहे.”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

आझमने यावेळी सलमानशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. “मला सलमान खानला भेटून त्याच्यासोबत एक व्हिडीओ करायचा आहे”, असं तो म्हणाला. आझम हा रिअल इस्टेटमध्ये काम करत असून इन्स्टाग्रामवर त्याचे एक लाख फॉलोअर्स आहेत. सलमानच्या विविध गाण्यांवर त्याने व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.