AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dance ऐन रंगात आला असतानाच होतं ‘असं’ काही, की खुदकन् हसायला येईल..! Video viral

School funny video : विनोदी व्हिडिओ (Comedy) पाहून हसणे हा यूझर्सचा आवडता छंद... सोशल मीडियावर (Social media) असे अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असतात, ज्यांना पाहून आपण हसून हसून बेजार होऊ.

Dance ऐन रंगात आला असतानाच होतं 'असं' काही, की खुदकन् हसायला येईल..! Video viral
मुलीचा डान्स सुरू असतानाच स्टेजवरून कोसळतात शिक्षकImage Credit source: Youtube
| Updated on: Mar 07, 2022 | 7:30 AM
Share

School funny video : विनोदी व्हिडिओ (Comedy) पाहून हसणे हा यूझर्सचा आवडता छंद… सोशल मीडियावर (Social media) असे अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असतात, ज्यांना पाहून आपण हसून हसून बेजार होऊ. एखादा सार्वजनिक कार्यक्रम सुरू असतो, आणि अचानक असे काहीतरी होते की आपल्याला हसू फुटते. अशा कार्यक्रमांसाठी मोठे स्टेज उभारलेले असते. राजकीय कार्यक्रम असेल किंवा शाळेतले स्नेह संमेलन. अशा ठिकाणी स्टेज उभारलेले असते. कधी कधी ते तकलादू असतो, त्यामुळे ते कोसळल्याचे प्रकार घडतात. तर कधीकधी एखाद्याचा स्टेजवरून तोल जातो आणि तो स्टेजवरून खाली कोसळतो, असेही व्हिडिओ आपण पाहिले असतील. याच प्रकारातला एक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून तुम्हाला हसू येईल. शाळेच्या स्नेह संमेलनातला हा व्हिडिओ आहे.

रंगतदार नृत्य

व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे, की एक विद्यार्थिनी नृत्य करत आहे. तिचा डान्स चांगला रंगात आला आहे. स्टेजवर तिच्याशिवाय मागे बहुतेक शाळेतले शिक्षक असावेत. दोघेजण मागे उभे असलेले दिसत आहेत. मग त्यांना कोणीतरी खुर्ची आणून देते. खुर्ची आल्यावर ते दोघेही त्यावर बसतात, मात्र लगेच मागच्या बाजूला कोसळतात. हे सर्व घडत असताना त्या मुलीचा डान्सही सुरू असतो. मात्र त्या मुलीलाही दाद द्यायला हवी. कारण तिचे शिक्षक स्टेजवरून खाली पडले, तरी ही मुलगी विचलित होत नाही. तिचा डान्स ती सुरूच ठेवते. हा अतिशय विनोदी असा व्हिडिओ आहे.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर मीडिया मराठी (Media Marathi) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 3 मार्चला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला 14,335+ व्ह्यूज आहेत. यात सातत्याने वाढ होत आहे. यूझर्सना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये स्मायली देऊन या व्हिडिओला दाद दिली आहे. (Video courtesy – Media Marathi)

आणखी वाचा :

Skating करण्याआधी Safety पाहिली नाही की ‘असं’ होतं! असे स्टंट करताना जरा जपूनच…

Viral video : ‘हे’ सर्वजण अख्ख्या रेल्वेला का ओढत आहेत? कारण ऐकून आश्चर्यचकित व्हाल आणि कौतुकही कराल

अरुंद जागेतून कार बाहेर काढण्याचा Stunt पडला महागात; पाहा, पुढे काय झालं?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.