AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Seema Haider | सीमा हैदर vs शेजारची भाभी, तू-तू-मैं-मैं, दोघींमध्ये सचिनवरुन वाजलं

Seeema Haider | दोघींमध्ये वाद नेमका कशावरुन झाला? 'लप्पू सा सचिन, वो झींगुर सा लड़का... उससे प्यार करेगी सीमा?' असं मिथिलेश भाटी म्हणाल्या. पाकिस्तानात पुरुष मेले आहेत का? की तिथे नाहीच आहेत?" असा सवाल मिथिलेश भाटी यांनी विचारलाय.

Seema Haider | सीमा हैदर vs शेजारची भाभी, तू-तू-मैं-मैं, दोघींमध्ये सचिनवरुन वाजलं
seema haider vs viral bhabhi mithilesh bhati
| Updated on: Aug 16, 2023 | 12:11 PM
Share

नोएडा : भारतीय प्रियकरासाठी पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर भारतात चर्चेचा विषय ठरली आहे. सीमा आणि तिचा प्रियकर सचिन मीणाबद्दल वारंवार वक्तव्य करणारी मिथिलेश भाटी सुद्धा सध्या चर्चेत आहे. मिथिलेश भाटी नोएडाच्या रबूपुरामध्ये राहते. मिथिलेश भाभी सचिनच्या शेजारी आहेत. मिथिलेश भाभीला सचिन-सीमाच्या लव्हस्टोरी बद्दल समजलं, तेव्हा त्यांनी विरोध केला. त्या सचिन-सीमाबद्दल बरच काही बोलल्या, सीमाने आता त्यावर रिएक्ट केलं आहे.

‘लप्पू सा सचिन, वो झींगुर सा लड़का… उससे प्यार करेगी सीमा?’ असं मिथिलेश भाटी म्हणाल्या. मिथिलेश यांचा हा डायलॉग सोशल मीडियावर इतका फेमस झाला की, त्यावर मीम्स, रील्स आणि फनी व्हिडिओ बनवण्यात येत आहेत.

‘पाकिस्तानात पुरुष मेले आहेत का?’

सीमा चुकीच्या पद्धतीने भारतात आली व तिने सचिनला ताब्यात घेतलं अंस मिथिलेश यांचं म्हणणं आहे. “पाव भर वजनाचा सचिन आणि पाच किलोची सीमा. पाकिस्तानात एक खोलीत राहणारी अशी बाहेर पडली की, तीन देशांच्या सीमा पार केल्या. पाकिस्तानात पुरुष मेले आहेत का? की तिथे नाहीच आहेत?” असा सवाल मिथिलेश भाटी यांनी विचारलाय.

मिथिलेश भाभी म्हणते, ‘मग मी मानते खरं प्रेम आहे’

सचिन सीमावर भरपूर प्रेम करतो, यावर मिथिलेश यांचं म्हणणं आहे की, “सीमा ज्या प्रमाणे शानमध्ये भारतात राहतेय, तसं तिने सचिनला 10 दिवसांसाठी पाकिस्तानात घेऊन जावं. मग हे खर प्रेम आहे हे मी मान्य करेन”

सीमा हैदर मिथिलेश यांच्याबद्दल काय म्हणाली?

सीमा हैदरला जेव्हा मिथिलेश भाटी यांचे तिच्याबद्दलचे विचार समजले, तेव्हा सीमा म्हणाला की, “कोणाच रंग-रुप पाहून प्रेम केलं जात नाही. प्रेम मनावर केलं जातं. दोन मनांमध्ये प्रेम असतं. कुठली तिसरी व्यक्ती हे समजू शकत नाही. सचिन मीणा मनाने खूप चांगला आहे. तो मनापासून माझ्यावर प्रेम करतो. कठीण परिस्थिती असूनही त्याने मला स्वीकारलं. याच्यापेक्षा प्रेमळ माणूस मला जगात भेटू शकत नाही. लोकांची प्रेमाचा अर्थ समजून घेतला पाहिजे” सीमा हैदरचा वकील काय म्हणाला?

सचिन-सीमाच्या वकिलाने मिथिलेश भाटी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची तयारी केली आहे. “असं कोणी कोणाबद्दल बोलू शकत नाही. ‘लप्पू सा सचिन, वो झींगुर सा लड़का… असं बोलणं योग्य नाही. बॉडी शेमिंग गुन्हा आहे” असं सीमाचा वकिल म्हणाला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.