Video | ‘हे’ लग्न पाहून सगळे अवाक्, एवढे योगायोग कसे? सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स

मालिकेत योगायोगाने झालेल्या लग्नाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या अचानकपणे लागलेल्या लाग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (accidental marriage scene funny video)

Video | 'हे' लग्न पाहून सगळे अवाक्, एवढे योगायोग कसे? सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 7:13 PM

मुंबई : छोट्या पडद्यांवरील मालिकांचं विश्व वेगळं असतं. या मालिकांमध्ये कधी काय होईल काही सांगता येत नाही. काही मालिका एवढ्या प्रसिद्ध झाल्या आहेत की त्यातील कथेची तसेच दृश्यांची अनेक वेळा वाहवा होते. मात्र, अशाच एका मालिकेत योगायोगाने झालेल्या लग्नाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या अचानकपणे लागलेल्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (serial accidental Marriage scene funny video goes viral)

हे लग्न झालेच कसे, एवढे योगायोग कसे?

हा व्हिडीओ नक्की कोणत्या मालिकेतील आहे, याबद्दल निश्चित माहिती समजू शकलेली नाही. मात्र, लग्न होण्यासाठी 30 सेकंदांमध्ये झालेले योगायोग आश्चर्यचकित करणारे आहेत. या व्हिडीओमध्ये एक तरुणी एका ड्रेसिंग टेबलच्या समोर बसलेली आहे. या तरुणीने आपला सर्व मेकअप केलेला आहे. त्याच वेळी एक तरुण ड्रेसिंग टेबलवर येतो. आल्यानंतर तो टेबलवरचा कंगवा उचलून आपले केस विंचरायला लागतो. मात्र, या वेळी योगायोगाने त्याने घातलेल्या शेरवानीला कुंकू लागते. त्यानंतर हा तरुण आरशात बघून केस विंचरत असताना शेरवानीमध्ये अडकलेल कुंकू बाजूला बसलेल्या तरुणीच्या भांगामध्ये जाऊन पडते. हा सगळा प्रकार एवढ्या नाटकीय पद्धतीने घडून आला आहे की, एवढे सारे योगायोग कसे घडू शकतात?, असा सवाला अनेकांनी विचरला आहे.

अत्यंत नाटकीय पद्धीतने हा सीन शूट केल्यामुळे सध्या याची चांगलीच चर्चा होत आहे, पाहा व्हिडीओ :

हे सगळे दृश्य पाहून सर्वांनी तोंडात बोट घातले आहे. हा व्हिडीओ पाहून मालिकांमध्ये काहीही होऊ शकतं, असं अनेकांनी मिश्किलपणे म्हटलं आहे. ट्विटर यूजर @Shayonnita15 या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ केल्यांतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.  मालिकेतील या सिनमुळे अनेकांना हसू फुटत आहे.

दरम्यान, आतापर्यंत तब्बल 60 हजार जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर दोन हजारांपेक्षा जास्त लाईक्ससुद्धा या व्हिडीओला मिळाले आहेत. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

इतर बातम्या :

Video | भूतानची छोटी मुलगी हात जोडून म्हणतेय Thank You भारत, व्हिडीओ बघून तुम्हीसुद्धा प्रेमात पडाल

VIDEO | रोलर कॉस्टर राइड सुरु असताना अचानक पक्षी आला आणि…

Viral Memes | नाकातून रक्त काढून दाखवा, स्वप्नील जोशी ते अण्णा नाईक, सेलिब्रिटींकडून ऐका त्यांचे आवडते मीम्स

(serial accidental Marriage scene funny video goes viral)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.