Video : ‘पोरीच्या बापानं मागं लागलं पाहिजे, पोरगी कर म्हणून..’ Viral होतंय Shivlila Patil यांचं तुफान विनोदी कीर्तन

Shivlila Patil Comedy Kirtan : व्हॅलेंटाइन डे (Valentine day) नुकताच झाला. आता त्याच्याशी संबंधित व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. ह. भ. प. शिवलीला पाटील यांचं एक कीर्तन सध्या व्हायरल (Viral) होतंय. यात त्या व्हॅलेंटाइन डे, प्रेम (Love), तरुणाई (Youth) यावर प्रकाश टाकत आहेत.

Video : 'पोरीच्या बापानं मागं लागलं पाहिजे, पोरगी कर म्हणून..' Viral होतंय Shivlila Patil यांचं तुफान विनोदी कीर्तन
प्रेम या विषयावर कीर्तन करताना ह. भ. प. शिवलीला पाटील
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 7:30 AM

Shivlila Patil Comedy Kirtan : व्हॅलेंटाइन डे (Valentine day) नुकताच झाला. जोडप्यांनी आपापल्या पद्धतीनं तो साजराही केला. काहींनी आपल्या खास स्टाइलने तो संस्मरणीय केला. काहींना मात्र ब्रेकअपलाही सामोरं जावं लागलं. व्हॅलेंटाइन डे आणि त्याच्याशी संबंधित व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. ब्रेकअप झालं की सगळं संपलं, असं मानणारेही अनेक असतात. मात्र असं काहीही नसतं. आयुष्यात ही काही एकमेव गोष्ट नाही, असंही मग आपले मित्र समजावून सांगतात. याचे व्हिडिओ आपण पाहत असतो. आता यात एका कीर्तनाची भर पडलीय. ह. भ. प. शिवलीला पाटील यांचं एक कीर्तन सध्या व्हायरल (Viral) होतंय. यात त्या व्हॅलेंटाइन डे, प्रेम (Love), तरुणाई (Youth) यावर प्रकाश टाकत आहेत. त्याबरोबरच काही महत्त्वाच्या गोष्टी, सल्लेही त्यांनी दिले आहेत.

‘प्रेम असं करावं’

व्हायरल झालेल्या या कीर्तनाच्या व्हिडिओमध्ये त्या आताच्या तरुणाईच्या प्रेमाच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एका व्हॅलेंटाइनला एक दुसऱ्या व्हॅलेंटाइनला दुसरं असं प्रेम काहीही कामाचं नाही. प्रेम राधेनं कृष्णाशी केलं, शबरीनं रामाशी केलं तसं हवं, असं त्या म्हणाल्या. तर श्रीमंतांच्या घरी जन्माला आला असलात तरी स्टाइल करताना जरा जपून करा, महिलेप्रमाणं नको, असा सल्लाही त्यांनी दिला. याव्यतिरिक्त प्रेम कसं असावं, याविषयी त्यांनी कीर्तनात विनोदी पद्धतीनं अनेक गोष्टी सांगितल्यात.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर एव्हरीथिंग इन मराठी (EveryThing In Marathi) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 27 फेब्रुवारी 2021ला अपलोड केलेल्या या व्हिडिओला व्ह्यूजही चांगले मिळत आहेत. 4.54 मिनिटांचा हा कीर्तनाचा व्हिडिओ Shivlila Patil Comedy Kirtan 2021, Full Comdey Dialogues, Latest Kirtan! must watch असा कॅप्शननं अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओ मागच्या वर्षीचा असला तरी तो मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. (Video courtesy – EveryThing In Marathi)

आणखी वाचा :

…अन् असा ‘धप्पा’ दिला, की आईही घाबरली; वाघाचा ‘हा’ Cute video झालाय Viral

Cat dog video : कुत्रा तुपाशी, मांजर उपाशी! ‘असा’ लगावला ‘मौके पे चौका’ की नेटिझन्स म्हणतायत, हा तर Smartdog!

#Earthquake : भूकंपानंतर आला महापूर पण Memesचा! ‘हा कधी झाला?’ म्हणत सोशल मीडियावर उडवताहेत खिल्ली

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.