धक्कादायक! विद्यार्थांना खाऊ घातला स्पर्म मिश्रीत केक; शिक्षिकेला 41 वर्षांचा तुरुंगवास

लुइसियानामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षिकेने (teacher)आपल्या पतीचे स्पर्म (Sperm) केकमध्ये मिसळवले. त्यानंतर हा केक तिने आपल्या विद्यार्थ्यांना खायला दिला आहे. ही बाब समोर आल्यानंतर या शिक्षिकेला आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला होता.

धक्कादायक! विद्यार्थांना खाऊ घातला स्पर्म मिश्रीत केक; शिक्षिकेला 41 वर्षांचा तुरुंगवास
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 8:38 PM

अमेरिकेतील (America) लुइसियानामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षिकेने (teacher)आपल्या पतीचे स्पर्म (Sperm) केकमध्ये मिसळवले. त्यानंतर हा केक तिने आपल्या विद्यार्थ्यांना खायला दिला आहे. ही बाब समोर आल्यानंतर या शिक्षिकेला आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला होता. या महिलेवर बलात्कार आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा देखील आरोप आहे. या महिलेने तिच्यावर करण्यात आलेले अनेक आरोप मान्य केले असून, याप्रकरणात तीला तब्बल 41 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ‘डेली स्टार’ने दिलेल्या वृत्तानुसार या महिलेचे नाव सिंथिया पर्किन्स असे आहे. सिंथिया एका शाळेमध्ये शिक्षिका आहे. ती ज्या शाळेत शिकवायची त्याच शाळेतील मुलाला तीने आपल्या पतीचे स्पर्म मिश्रीत केक खाऊ घातला होता.

2019 मध्ये अटक

या प्रकरणी 2019 मध्ये सिंथिया आणि तिचा नवरा डेनिस यांना अटक करण्यात आली होती. डेनिस हा पोलीस अधिकारी होता. मिळत असलेल्या माहितीनुसार त्यानंतर डेनिस आणि सिंथियाचा घटस्फोट देखील झाला आहे. गुन्हा उघड झाल्यानंतर सिंथियाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. तिच्यावर बलात्कार आणि लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे देखील आरोप आहेत. सुरुवातीला या महिलेने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. मात्र त्यानंतर तीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुरुवातीला 72 वर्षांची शिक्षा

गेल्या आठवड्यात, न्यायालयाने सिंथियाला विद्यार्थ्यांच्या केकमध्ये शुक्राणू मिसळल्याबद्दल एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती आणि लैंगिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याबद्दल तिला तब्बल 40 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान सिंथियाचा पूर्व पती डेनिस याचा या प्रकरणात सहभाग आहे का याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. सिंथियाला विविध गुन्ह्यात 72 वर्षांची शिक्षा सुणावण्यात आली होती. मात्र तीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तिची शिक्षा काही वर्षांनी कमी करून तिला 41 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

सोनम गुप्तानंतर आता राशी बेवफा; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

थरकाप उडवणारा व्हिडीओ! इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील बाल्कनीला लटकून व्यायाम, नेटकरी म्हणतात…

पाकिस्तानी खासदाराचा 31 वर्षाने लहान असलेल्या पत्नीसोबतचा बेडवरचा VIDEO झाला VIRAL

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.