Funny viral video : …अन् विक्रेत्याचा ग्राहकांनी ‘असा’ उठवला फायदा, तुम्ही केलंय का असं कधी?

शॉपिंग (Shopping) हा आपल्या सर्वांचाच आवडता उद्योग. काही जणांना मात्र शॉपिंग नाही तर टाइमपास करायचा असतो. असाच एका रिकामटेकड्या ग्राहकांचा (Customers) फटका मॉलमधल्या (Mall) कर्मचाऱ्याला बसला आहे. हा व्हिडिओ खूप मजेदार आहे.

Funny viral video : ...अन् विक्रेत्याचा ग्राहकांनी 'असा' उठवला फायदा, तुम्ही केलंय का असं कधी?
दुकानदाराची फिरकी घेताना ग्राहक
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 8:30 AM

शॉपिंग (Shopping) हा आपल्या सर्वांचाच आवडता उद्योग. कोणाला मोठ्या मॉलमधून शॉपिंग करायला आवडतं तर कोणाला एखाद्या शोरूममधून तर कोणाला छोट्या दुकानातून… काही जणांना पैसे वाचवायचे असतात. म्हणून मग ते जिथं कुठं ऑफर असेल अशी ठिकाणं शोधत असतात. काही जणांना मात्र शॉपिंग करायची नसते. पण उगीच एखाद्या दुकानात जाऊन विचारपूस करणं किंवा एखाद्या भल्यामोठ्या शॉपिंग मॉलमध्ये जाऊन विविध वस्तू पाहण्याचा छंदच असतो. त्यामुळे दुकानदाराला किंवा तिथला जो कोणी विक्रेता असतो, त्याला विनाकारण आपला वेळ वाया घालवावा लागतो. असाच एका रिकामटेकड्या ग्राहकांचा (Customers) फटका मॉलमधल्या (Mall) कर्मचाऱ्याला बसला आहे. हा व्हिडिओ खूप मजेदार आहे. यातही दोघेजण एका मॉलमध्ये घुसतात आणि विक्रेत्याचा टाइमपास करतात. यूझर्सना हा व्हिडिओ आवडला असून तो आता व्हायरल झालाय.

रिकामटेकडे ग्राहक

व्हिडिओमध्ये आई आणि एक तरूण मुलगा दाखवलाय. ते दोघे एका भांड्याच्या मोठ्या मॉलसारख्याच एका दुकानात जातात. तिथं त्यांना हव्या असलेल्या वस्तू सेल्समनला विचारतात. मग एक एक वस्तू हा तरूण मुलगा पाहतो आणि आपल्या आईला विचारतो. मग तीही हात दाखवून चांगल्या असल्याचे इशारे करते. मग सेल्समनला वाटतं पार्टी मोठी आहे. तो त्यांच्यासाठी खायलाही मागवतो. दोघेही भरपेट जेवण करतात. नंतर सेल्समनला टीव्ही आहे का, असं विचारतात. नंतरची धमाल व्हिडिओमध्ये पाहण्यासारखीच आहे.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर सलमान नोमान (Salman Noman) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 22 फेब्रुवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला तुफान प्रतिसाद मिळत आहे. 6.7 मिलियनहून अधिक व्ह्यूज काही तासांत या व्हिडिओला मिळाले आहेत. ‘Kabhi aisa kiya hai?’ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. कमेंट्समध्ये अनेकांनी हसण्याचे इमोजी दिले आहेत. (Video courtesy – Salman Noman)

आणखी वाचा :

Kabristan wala restaurant : भारतातलं एक अजब रेस्टॉरंट, कुठे आहे? काय खास? पाहा ‘हा’ Viral video

‘माणसानं माणसाशी माणुसकीनं वागलं पाहिजे’, ‘हे’ तीन मित्र कसा देतायत संदेश? पाहा Video

गाणं तर हिट झालं आता नृत्यही! Kacha badam गाण्यावर Bhuban Badyakarचा Dance video viral

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.