चिमुरड्यानं स्वीकारलंय पाणीपुरी खाण्याचं चॅलेंज आणि तुम्ही? ‘हा’ Video पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी
सोशल मीडिया(Social Media)वर मजेशीर व्हिडिओंचा महापूर आहे. आव्हानात्मक व्हिडिओ पाहायला अनेकांना आवडतं. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या प्रचंड व्हायरल (Viral) होतोय. यात एक छोटा मुलगा चॅलेंज स्वीकारत असल्याचं दिसतंय.
Panipuri challenge Video : सोशल मीडिया(Social Media)वर मजेशीर व्हिडिओंचा महापूर आहे. कधी विनोदी, कधी खाद्य पदार्थांचे व्हिडिओ तर कधी आव्हानात्मक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. आव्हानात्मक व्हिडिओ पाहायला अनेकांना आवडतं. व्हिडिओमध्ये दिलेलं चॅलेंज मग अनेकजण स्वत: स्वीकारून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. एका मिनिटात एखादा पदार्थ खाऊन दाखवा किंवा बनवून दाखवा अशाप्रकारचे व्हिडिओ तर आपण नेहमीच पाहतो. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या प्रचंड व्हायरल (Viral) होतोय. या व्हिडिओत एक छोटा मुलगा चॅलेंज स्वीकारत असल्याचं पाहायला मिळतंय.
पाणीपुरीचा व्हिडिओ
पाणीपुरी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. हा व्हिडिओही पाणीपुरीचा आहे. यात एक चॅलेंज दिलंय. एक छोटा मुलगा केवळ 25 सेकंदांत 5 पाणीपुरी खाण्याचा पराक्रम करत असताना दिसतोय. विशेष म्हणजे या चिमुरड्यानं आधीही एक चॅलेंज पूर्ण केलं होतं. त्यानं आधी 30 सेकंदांत 5 पाणीपुरी खाल्ल्या होत्या. आता स्वत:चच रेकॉर्ड त्यानं मोडलं.
यूट्यूबवर शेअर
फुडीज आओ (foodies aao) या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. काही तासांपूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला 342,167+ व्ह्यूज मिळाले आहेत. चिमुरड्यानं 25 सेकंदांत पाच पाणीपुरी खाण्याचं चॅलेंज स्वीकारलं आणि पूर्णही केलं. शेवटी मात्र थोडी गडबड झाली, ती पाहून तुम्हाला हसू येईल. तर या काकांनी या चिमुरड्याकडून पैसे घेतले नाहीत. पाणीपुरीवाल्या काकांनी थोडा उशीर केला नसता तर… असा विचार आपण करत राहतो.
मजेदार कमेंट्स
या व्हिडिओला अनेकांनी लाइक तर केलं आहेच. मात्र मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. हा मुलगा खूपच क्यूट आहे, अशी एकानं कमेंट केलीय. तर आपणही हे चॅलेंज स्वीकारणार असल्याचं एकानं म्हटलंय. तर एकानं अंकलजी कितने प्यारे हैं असं म्हणत काकांचीही पाठराखण केली. हा व्हिडिओ पाहू या… (Video Courtesy – foodies aao)